ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वरांची पदवी अन् बाबा बागेश्वर नाराज, म्हणाले, ज्याच्या मनात …

  • Written By: Published:
ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वरांची पदवी अन् बाबा बागेश्वर नाराज, म्हणाले, ज्याच्या मनात …

Baba Bageshwar On Mamta Kulkarni: गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या महाकुंभात (MahaKumbh) काहींना काही कारणाने सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत राहणारी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले आहे. मात्र त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Baba Bageshwar) यांनी देखील यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर कसं काय बनवण्यात येत आहे. ही पदवी ज्याच्या मनात संत किंवा साध्वीची भावना आहे त्यालाच दिली पाहिजे. असं बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील अनेक साधू संतांनी ममता कुलकर्णी प्रकरणात नाराजी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना बाबा बागेश्वर यांनी नाराजी व्यक्त करत ममता कुलकर्णी यांना कोणी संत किंवा महामंडलेश्वर कसे बनवू शकते? असा प्रश्न उपस्थित केला तसेच ज्याच्या मनात संत किंवा साध्वीची भावना आहे त्यालाच या प्रकारची पदवी दिली पाहिजे. असं देखील ते म्हणाले.

महाकुंभात 5 दिवस राहणार

माध्यमांशी बोलताना बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महाकुंभात प्रसिद्ध होणाऱ्या लोकांवर देखील आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येकजण आपले काम करत राहतो. असं ते म्हणाले. तसेच सनातन बोर्डाच्या स्थापनेसंदर्भात 27 जानेवारी रोजी होणाऱ्या धर्म संसदेवर त्यांनी सांगितले की, आता भारत लवकरच हिंदू राष्ट्र बनेल. यासोबतच त्यांनी पुढील 5 दिवस महाकुंभात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व प्रक्रियांचे पालन : किन्नर आखाडा

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ही पदवी धारण केली. आखाड्याच्या आचार्यांनी ममता कुलकर्णी यांचा अभिषेक केला, त्यानंतर त्यांना यमाई ममता नंद गिरी म्हणून ओळखले जात आहे. या प्रकरणात किन्नर आखाड्याचे म्हणणे आहे की सर्व प्रक्रियांचे पालन केल्यानंतर ममता महामंडलेश्वर बनली आहे. शुक्रवारी ममताने किन्नर आखाड्यात संन्यास घेतला. आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांना अभिषेक करून महामंडलेश्वर बनवले आणि त्यांना श्रीयमाई ममतानंद गिरी हे नवीन नाव दिले.

बजेटपूर्वीच सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा, 1 एप्रिलपासून लागू होणार UPS योजना

follow us
  • fb
  • instagram
  • youtube