ड्रग्स कनेक्शनमध्ये नाव? तब्बल 25 वर्षानंतर भारतात परतली…कुंभमेळ्यात ममताने घेतला संन्यास
Actress Mamta Kulkarni 2000 Crore Drug Case Allegations : 90 च दशक गाजवलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) तब्बल 25 वर्षानंतर देशात परतली. त्यानंतर ममताने महाकुंभात (Mahakumbh) जावून संन्यास घेतलाय. त्यामुळं ममता कुलकर्णी चांगलीच चर्चेत आहे. एका टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2016 मध्ये ममताच्या विरोधात महाराष्ट्रात ठाणे येथे एफआयआर नोंदवण्यात आला होता.
ममताने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे या प्रकरणाशी संबंधित माहिती दिली. ती 2000 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित एका कायदेशीर प्रकरणात अडकली होती. 2016 मध्ये ममता कुलकर्णी (Bollywood News) हिच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. मात्र, नुकताच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ममता यांच्याविरुद्धचा हा एफआयआर रद्द केला (Mahakumbh 2025) होता. केनियातील एका आंतरराष्ट्रीय ड्रग ग्रुपसोबत संपर्क असल्याचा आरोप ममतावर होता.
महाकुंभात ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर
‘करण अर्जुन ‘, ‘सबसे बडा खिलाडी’ आणि ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या ममता कुलकर्णी 2000 साली भारत सोडून परदेशात स्थायिक झाल्या होत्या. 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात 2015-2016 दरम्यान अचानक ममता बॅनर्जीने नाव चर्चेत आले. 2014 मध्ये ममता कुलकर्णीचे नाव विकी गोस्वामीसह ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे चर्चेत आले होते. ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्रीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यंदा मात्र ममताला या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.
एकनाथ शिंदे गावाला अन् त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत…, आदित्य ठाकरेंचा टोला
25 वर्षे कुठे गायब झाली? यावर ममता अभिनेत्री म्हणाली की, माझं भारत सोडण्याचं कारण अध्यात्म होतं. 1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला. त्यादरम्यान माझी भेट गुरू गगन गिरी महाराज यांच्याशी झाली. त्यांनंतर माझी अध्यात्माची आवड वाढली. तपश्चर्या सुरू झाली. मुंबईला परतताना तुम्हाला कसं वाटलं? असं विचारल्यावर यावर ममता कुलकर्णी म्हणाल्या, मी मुंबईला पोहोचताना खूप भावूक झालो. माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण मी जिथून सुरुवात केली. ज्या बॉलीवूडमधून मला खूप काही मिळालं ते ठिकाण आठवलं.
तर आता महाकुंभात संन्यास घेऊन ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर झाल्यात. त्यांनी त्यांचे पिंड दानही केलंय. याशिवाय ममताला आता नवीन नाव मिळालंय. ममताने संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर तिला किन्नर आखाड्यात त्यांना महामंडलेश्वर करण्यात आलंय. अभिनेत्री आता ममता कुलकर्णीऐवजी महामंडलेश्वर ममता नंद गिरी म्हणून ओळखली जाणार आहे.