सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Salman Khan House Firing Case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. (Salman Khan House Firing Case) तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याविरुद्ध विशेष न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. बिश्नोई टोळीचा कथित सदस्य रोहित गोदेराविरुद्धही वॉरंट जारी करण्यात आले आहे. सलमान खानच्या घरातील गोळीबार प्रकरणातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट मानले जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


14 एप्रिल रोजी अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता. या घटनेच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी या महिन्याच्या सुरुवातीला दाखल केलेल्या आरोपपत्रात गोदेरा आणि अनमोल यांच्यासह लॉरेन्स बिश्नोई यांची नावे फरार आरोपी म्हणून ठेवण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई हे सध्या अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल आणि गोदेरा भारतात नसून ते कॅनडात आहेत.

Salman Khan : सिद्धू मुसेवालाप्रमाणेच भाईजानचा ‘गेम’; पोलिसांकडून दोषारोपपत्रात धक्कादायक खुलासे

फिर्यादीची याचिका स्वीकारून, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी अनमोल आणि गोदेरा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी 14 एप्रिलच्या पहाटे सलमानच्या निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. सोनू कुमार बिश्नोई, मोहम्मद रफिक चौधरी आणि हरपाल सिंग यांच्यासह हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अनुज कुमार थापन याने पोलिस कोठडीत आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

Salman Khan: भाईजानच्या घरावरील गोळीबाराचे खरं कारण आलं समोर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात काय म्हटले? वाचा

यावर सलमाननेही प्रतिक्रिया दिली

सलमान खानच्या घरात झालेल्या गोळीबारानंतर सुपरस्टारची सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीसही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. यावर खुद्द सलमान खानने प्रतिक्रिया दिली होती आणि याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली होती. यादरम्यान सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांनाही अनेक प्रश्न विचारण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube