Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Out: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 11T103052.156

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Out: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत होते. हा चित्रपट २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या चित्रपटात सलमान खानशिवाय व्यंकटेश, पूजा हेगडे आणि जगपती बाबू यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान भाईजानच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि रोमँटिक सीनचा जबरदस्त तडका आहे. या ट्रेलरची सुरुवात सलमान खानच्या एंट्रीने होते आणि बॅकग्राउंडमध्ये त्याच्या आवाजात संस्कृत श्लोकांचे पठण होते.

यानंतर पूजा हेगडे सलमानला विचारते, ‘तुझे नाव काय आहे?’ यावर सलमान सांगितले आहे, ‘माझे नाव नाही. मला भाईजान या नावाने ओळखले जाते. पहिल्या नजरेतच पूजा भाईजानच्या प्रेमात पडते आणि सलमान खानला भाईजान म्हणत असताना तिची जीभ तोतरी होते. त्यानंतर ती त्याला ‘जान’ म्हटले तर चालेल का? असा सवाल करते.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची कोर्टात बिनशर्त माफी

भाईजान आणि पूजा हेगडे यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. पूजा हेगडे तिच्या ‘जान’ची म्हणजेच भाईजानची तिच्या भावाशी (व्यंकटेश) ओळख करून देते. इथे या सिनेमाला नवे वळण मिळते. खरंतर, पूजा हेगडेच्या आयुष्यात एक खलनायक आहे, आणि हा खलनायक म्हणजे जगपती बाबू. पूजा हेगडे आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी भाईजान उचलेली आहे.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

या ट्रेलरमध्ये अॅक्शनचा जबरदस्त तडका आहे. यामध्ये सलमान खान जगपती बाबू आणि विजेंद्र सिंग यांना खतरनाक स्टाईलमध्ये मारहाण करताना दिसत आहे. ‘मी माणूस म्हणून माणुसकीला साथ देईन’ असं भाईजान ट्रेलरमध्ये म्हणताना दिसतोय. ‘ये हिंसा नहीं, सेल्फ डिफेन्स है’, ‘पॉवर नही, इच्छाशक्ती…’ दरम्यान, पूजा हेगडे तिच्या क्युट स्माईलने चाहत्यांची मने जिंकली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube