Salman Khan Post: ‘ढाई किलोचा हात अन् चाळीस कोटींची कमाई…’ भाईजानने केली सनी पाजीसाठी खास पोस्ट

Salman Khan Post: ‘ढाई किलोचा हात अन् चाळीस कोटींची कमाई…’ भाईजानने केली सनी पाजीसाठी खास पोस्ट

Salman Khan Special Post Sunny Deoll: अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित ‘गदर २’ ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाडके कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४० कोटींची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र या सिनेमाला कौतुकाचा वर्षाव होत असताना दिसत आहे, अनेक सेलिब्रिटींनी ही सनी पाजीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भाईजानने (Salman Khan) सनी पाजीच्या (Sunny Deoll) सिनेमासाठी खास पोस्ट केली आहे.

सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४० कोटींचा गल्ला कमावला आहे. पहिल्याच दिवशी इतकी जबरदस्त कमाई केली आहे, हे बघून अनेक सेलिब्रिटींनी सिनेमाच्या निर्मात्यांसह, दिग्दर्शकांवर आणि कलाकाराचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच सनी देओल, अमिशा पटेल आणि उत्कर्ष शर्मा अभिनित सिनेमाचे बॉलिवूडच्या भाईजानने सिनेमाचे कौतुक केले आहे. त्याने खास पोस्ट करत सर्वच कलाकारांचे कौतुक केले आहे.

भाईजान पोस्ट करत म्हणाला आहे की, “ढाई किलोचा हात चाळीस कोटींच्या कमाईसोबतची आहे. सनी पाजी तुम्ही धडाकेबाज कमाई केली आहे. ‘गदर २’च्या टीमचे अभिनंदन.” अद्याप भाईजानच्या पोस्टवर सनी देओलने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नेमका सनी पाजीच्या या ट्वीटवर सनी देओल उत्तर देणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

OMG 2 Gadar 2 Release : ‘ओएमजी 2’ च्या पोस्टरवर दूध, सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स; प्रेक्षकांचा धुमाकूळ

भाईजानच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील भाईजानच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ११ ऑगस्टच्या संध्याकाळच्या शो दरम्यान सिनेमागृहात चाहत्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली, सिनेमाचा वाढता प्रतिसाद बघता सिनेमा दुसऱ्या दिवशी ५० कोटींच्या आसपास कमाई करू शकणार आहे. एकूणच हा पहिल्या विकेंडमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube