संगीत देवबाभळी अन् वरवरचे वधू वर नाटकांचे शो अचानक रद्द, काय आहे कारण?

Sangeet Dev Babhali Drama : सध्या मराठी नाटकांचा सुवर्णकाळ चालू आहे असं म्हटल्यास हरकत नाही. कारण प्रेक्षक सध्या सिनेमांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मराठी नाटक पाहायला उपस्थिती लावत आहेत. (Drama) देव बाभळी नाटकांच्या तिकीट खिडकीवर हाउसफुलचे बोर्ड अगदी काही वेळातच झळकताना पाहायला मिळतायत. प्रेक्षकही काही गाजलेल्या नाटकांचे शो आपल्या शहरात कधी लागणाऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, प्रेक्षकांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे.
काल अचानक देव बाभळी या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत नाटकाची प्रोडक्शन कंपनी असलेल्या टीम भद्रकालीच्या सोशल मीडिया अकाउंट वरून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. काही अपरिहार्य कारणास्तव ‘ संगीत देवबाभळी’ चा आज रविवार 10 ऑगस्ट 2025 चा प्रयोग रद्द करण्यात आलेला आहे. कृपया रसिका प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. गैरसोयी बद्दल क्षमस्व! या रद्द झालेल्या प्रयोगाचा रिफंड बुक माय शो कडून देण्यात येईल असंही त्यावर कळवलं आहे.
तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार; एका संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार
टीम भद्रकालीच्या या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र काहींनी समजूतदारपणा सुद्धा दाखवलाय. त्यानंतर भद्रकाली टीमकडून आणखी एक पोस्ट शेअर करण्यात आले ज्यामध्ये या नाटकात आवली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते ही टायफॉइड मुळे आजारी पडल्याने काल शनिवारी 9 ऑगस्ट दुपारी चार वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवीचा आणि आज रविवार 10 ऑगस्ट दुपारी 4:30 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण वरील दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले. कृपया रसिका प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. गैरसोयी बद्दल क्षमस्व. या रद्द झालेल्या प्रयोगाचे रिफंड बुक माय शो कडून 7-8 दिवसा येईल, असंही लिहिलं आहे. या पोस्टवर प्रेक्षकांच्या अवली म्हणजेच शुभांगी सदावर्ते यांना लवकरात लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा देणाऱ्या कमेंट पाहायला मिळतायेत.
केवळ संगीत देवबाभळी नव्हे तर सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांचे वरवरचे वधू-वर या नाटकाचा प्रयोग सिद्धार्थ करण्यात आला आहे. सखी गोखले ने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यात तिने लिहिले, मिस्टर मिसेस माने आणि पांडा आजारी आहेत. वरवरचे आजार पण आहे पण नाईलाजारी काही प्रयोग रद्द करतोय! लवकरच पुन्हा प्रयोग सुरू होतील निश्चिंत रहा. या नाटकाचे 9 आणि 10 ऑगस्ट चे प्रयोग रद्द करण्यात आल्याची माहिती तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिली आहे. सखीच्या या पोस्टवर देखील चाहत्यांनी लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.