Satyaprem Ki Katha Trailer: ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर आऊट; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज

  • Written By: Published:
Letsupp Image (40)

Satyaprem Ki Katha Trailer Release : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये कियारा आणि कार्तिकचा रोमँटिक अंदाज बघायला मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एका गुजराती जोडप्याची झलक बघायला मिळत आहे. कियारा आणि कार्तिकच्या लव्हस्टोरी चाहत्यांना या सिनेमात बघायला मिळणार आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करताना कियारा आणि कार्तिक दिसणार आहेत.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज तारीख समोर येताच चाहते उत्साहित झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, शेवटी ट्रेलर उद्या रिलीज होत आहे. दुसर्‍याने लिहिले, सत्तू आणि कथा यांना भेटण्याची वाट पाहत आहे. तर तिसर्‍या चाहत्याने लिहिले, आता भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी सत्यनारायण की कथा असं होतं, मात्र त्याच्या नावावरुन झालेल्या वादामुळं त्याचं नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असं ठेवण्यात आलं आहे. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सत्यप्रेम की कथा या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन आशिकी 3, कॅप्टन इंडिया या चित्रपटात दिसणार आहे. तर, कियारा अडवाणी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाबरोबरच गेम चेंजर चित्रपटात दिसणार आहे.

Tags

follow us