Veer Zara Re-Release: ‘वीर-झारा’ होणार ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित, जाणून घ्या तारीख

Veer Zara Re-Release: ‘वीर-झारा’ होणार ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित, जाणून घ्या तारीख

Veer Zara Re-Release: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री प्रीती झिंटाचा (Preity Zinta) सुपरहिट चित्रपट ‘वीर-झारा’ पुन्हा (Veer Zara Movie) थिएटरमध्ये परतत आहे. 20 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा त्यांच्या प्रसिद्ध प्रेमकथेसह मोठ्या पडद्यावर कमबॅक (comeback) करत आहे. हा रोमँटिक ड्रामा चित्रपट यश चोप्रा (Yash Chopra) यांनी दिग्दर्शित केला होता आणि बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला होता.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

13 सप्टेंबरला ‘वीर-झारा’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानने भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो एका पाकिस्तानी राजकारण्याची मुलगी झारा हिच्या प्रेमात पडतो. या चित्रपटाची कथा प्रेमाच्या विजयाची कथा सांगते, जी पाकिस्तानी वकिलाच्या (राणी मुखर्जी) मदतीने 22 वर्षांनी पूर्ण होते.

कलाकारांची टीम

शाहरुख आणि प्रितीसोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, दिव्या दत्ता, मनोज बाजपेयी, बोमन इराणी, अनुपम खेर आणि किरण खेर सारखे दमदार कलाकारही होते. ‘वीर-जारा’ची ‘दो पल रुका’, ‘तेरे लिए’ ही सुपरहिट गाणी आजही लोकांच्या हृदयात आहेत आणि त्यांच्या आवडत्या यादीत समाविष्ट आहेत.

Shahrukh Khan Birthday : पठाण, जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार?

चित्रपटाचे यश आणि बजेट

‘वीर-झारा’ आदित्य चोप्राने 23 कोटींच्या बजेटमध्ये बनवला होता. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात 41.86 कोटी रुपयांची कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्याच वेळी, या चित्रपटाने जगभरात 97.64 कोटींची कमाई केली होती.

‘वीर-झारा’ चित्रपट पुन्हा कधी प्रदर्शित होतोय?

शाहरुख खान आणि प्रिती झिंटाचा चित्रपट ‘वीर-झारा’ 13 सप्टेंबर रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना ही प्रेमकथा पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube