Shahrukh Khan Birthday : पठाण, जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार?

Shahrukh Khan Birthday : पठाण, जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार?

Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानचा आज वाढदिवस (Shahrukh Khan Birthday) आपल्या चाहत्यांना त्याने आजही आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिल आहे. हे गिफ्ट म्हणजे शाहरूखचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पठाण जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार का? डंकी कसा असणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Pune News : लॅपटॉप चोरी करणारा जेरबंद…

पठाण जवानची दमदार कामगिरी पाहता ‘हे’ वर्ष शाहरुखचंच होतं असं म्हणावं लागेल. कारण या अगोदर शाहरुख खान चार वर्षे सिनेसृष्टीपासून दूर होता. त्यानंतर ‘पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून त्याने जोरदार कमबॅक केलं. जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. त्यानंतर त्याचा ‘जवान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘पठाण’चाही रेकॉर्ड मोडला. आता त्याचा ‘डंकी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Prakash Solanke : जाळपोळीमागे माझे राजकीय विरोधक; प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप

मात्र पठाण आणि जवान प्रमाणे डंकी देखील सुपरहीट ठरणार का? कारण पठाण असो कींवा जवान हे चित्रपटांबद्दल सांगायचे झालं तर पठाण हा शाहरूखचं कमबॅक होतं. त्यामुळे चाहते उत्सुक होते. त्याचं प्रमोशन देखील दमदार करण्यात आलं होतं. त्यात खास गोष्ट होती की, ती पठाण जगभर रिलीज करण्यात आला होता. आणि शहरूखचं जगभरातील फॅनफॉलोविंग यामुळे पठाण हीट झाला तर जवान हा ‘जवान’ सिनेमा मल्टीस्टारर होता. जबरदस्त ॲक्शन सीन, अनेक ट्विस्ट, अनेक सोशल मेसेज त्यामुळे चाहत्यांनी तो डोक्यावर घेतला.

तर डंकी विषयी बोलायचं झालं तर हा डंकी फ्लाईटवर आधारित आहे. एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासी जेव्हा अनधिकृतरित्या जातात तेव्हा त्याला ‘डंकी फ्लाइट’ असे म्हटले जाते. भारतीय लोक अमेरिकेतून कॅनडाला जाण्यासाठी या ‘डंकी फ्लाइट’चा अवलंब करतात. हा सिनेमा नाट्यमय आहे. एका पंजाबी मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. तो पंजाबला जाण्यासाठी ‘डंकी फ्लाइट’ने जातो. या प्रवासादरम्यान त्याला अनेक चॅलेंजेसचा सामना करावा लागतो. ‘डंकी’ हा सिनेमा नाताळात 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube