शाहिद कपूर अन् क्रिती सेननची भन्नाट प्रेमकहाणी; ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’चा ट्रेलर रिलीज

शाहिद कपूर अन् क्रिती सेननची भन्नाट प्रेमकहाणी; ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’चा ट्रेलर रिलीज

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer Released Out: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) चित्रपट ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा ट्रेलर (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer ) रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे शाहिद आणि क्रिती पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोन्ही स्टार्सची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि दरम्यानच्या काळात निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा ट्रेलर रोमान्स आणि ड्रामाने भरलेला पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)


ट्रेलर पाहून चित्रपटाच्या कथेचा अंदाज बांधता येतो. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात क्रिती सेनन शाहिद कपूरसोबत प्रेम करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती सिफ्रा या अमेरिकन मुलीची भूमिका साकारणार आहे, जी भारतीय कुटुंबात सून म्हणून येणार आहे आणि सर्वांना आश्चर्यचकित करेल. ट्रेलरच्या शेवटी, सिफ्रा (क्रिती सेनॉन) ही मुलगी नसून प्रत्यक्षात एक रोबोट असल्याचे दाखवण्यात आले आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट: शाहीद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपासून ते गाण्यांपर्यंत, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा ट्रेलर प्रेक्षकांना चित्रपटात खिळवून ठेवणार आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सॅनन व्यतिरिक्त, धर्मेंद्र, डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार दिग्दर्शक अमित जोशी आणि आराधना शाह यांच्या चित्रपटात दिसणार आहेत.

Rohit Shetty: शिल्पा अन् दीपिका रोहित शेट्टीच्या ‘गुड बुक’मध्ये, केलं तोंडभरून कौतुक

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ यावर्षी व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube