शाहिदच्या ‘TBMAUJ’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई, वीकेंडला गाजवणार बॉक्स ऑफिस?

शाहिदच्या ‘TBMAUJ’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई, वीकेंडला गाजवणार बॉक्स ऑफिस?

TBMAUJ Box Collection Day 1: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनेन (Kriti Sanon) यांचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. या चित्रपटाला चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही चाहते म्हणत आहेत की, हा चित्रपट खूप मनोरंजक आहे, त्यात खूप कॉमेडी आहे. त्याचवेळी, काही वापरकर्ते म्हणतात की चित्रपटात कोणतेही तर्कशास्त्र नाही.

याशिवाय अनेक चाहते क्रिती सेननच्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. यावर काही युजर्सचे आपली प्रतिक्रिया दिली आहे, क्रितीने तिची रोबोटची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे मंडळी आहे. चित्रपट रिलीज होताच चाहत्यांच्या नजरा त्याच्या कमाईवर खिळल्या होत्या. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबाबतही अंदाज बांधण्यास सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत आता आम्ही तुमच्यासाठी ‘तेरी बात में ऐसा उल्झा जिया’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर घेऊन आलो आहोत.

सकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 6.50 कोटींची कमाई केली आहे. मात्र, या चित्रपटाचा अंदाजही 6 ते 7 कोटींच्या दरम्यानच वर्तवण्यात आला होता. ॲडव्हान्स बुकिंग लक्षात घेऊन हा आकडा देण्यात आला आहे. या चित्रपटाला चांगली वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटी मिळाल्यास शनिवार आणि रविवारच्या आकडेवारीत मोठी झेप घेता येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya शाहिद अन् क्रितीचा चित्रपट पाहण्याची 5 कारणे!

जर्सी आणि रंगूनचे रेकॉर्ड मोडले: शाहिद कपूर त्याच्या कामात खूप निष्णात आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहत्यांना वेड लागले आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईसह शाहिदने त्याच्या दोन चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. एक त्याचा आधी प्रदर्शित झालेला जर्सी आणि दुसरा रंगून. जर्सीने पहिल्या दिवशी 2.93 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचवेळी रंगूनने 5.05 कोटींची कमाई केली होती. तरी देखील त्याचे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube