शाहिदच्या ‘TBMAUJ’ची दुसऱ्याच आठवड्यात बंपर कमाई, वीकेंडला गाजवणार बॉक्स ऑफिस?

शाहिदच्या ‘TBMAUJ’ची दुसऱ्याच आठवड्यात बंपर कमाई, वीकेंडला गाजवणार बॉक्स ऑफिस?

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection Day 15: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) स्टारर ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. या रोमकॉमला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. (TBMAUJ) या काळात चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरी ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ने चांगले कलेक्शन केले आहे. शाहीद कपूरच्या चित्रपटाने रिलीजच्या 15व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी किती कलेक्शन केले चला तर मग जाणून घेऊया?

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ने 15 व्या दिवशी किती कमाई केली? ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हा चित्रपट एका अशक्य प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा रोबोट (क्रिती सॅनन) आणि वैज्ञानिक (शाहिद कपूर) यांच्याभोवती फिरते. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. मात्र, चित्रपटच्या कमाईचा आलेख सातत्याने वर-खाली होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)


आता ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि चित्रपट तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ने 6.7 कोटी रुपयांचे खाते उघडले होते. चित्रपटाची पहिल्या आठवड्यात 44.35 कोटींची कमाई झाली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 21.65 कोटींची कमाई केली आहे. आता तिसऱ्या शुक्रवारच्या म्हणजेच चित्रपटाच्या रिलीजच्या 15व्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ने रिलीजच्या 15 व्या दिवशी 2.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चे 15 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 68.30 कोटी रुपये झाले आहे.

Box Office: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘क्रॅक’चा धिंगाणा! कमावले ‘इतके’ कोटी

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ने जगभरात किती कमाई केली? ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ जगभरातील बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करत आहे आणि यासोबतच हा चित्रपटही जगभरात लक्ष वेधून घेत आहे. मॅडॉक्स फिल्मने ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’च्या 14 दिवसांच्या जगभरातील कमाईचे आकडे शेअर केले आहेत. यानुसार, शाहिद आणि क्रितीच्या चित्रपटाने रिलीजच्या 14 दिवसांत जगभरात 120.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ स्टार कास्ट: ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’मध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात धर्मेंद्र, डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट व्हॅलेंटाईन वीकमध्ये 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube