Sharad Ponkshe: ‘बापाला आणखी काय हवं?’ शरद पोंक्षेंची लेक झाली पायलट!

Sharad Ponkshe: ‘बापाला आणखी काय हवं?’ शरद पोंक्षेंची लेक झाली पायलट!

Sharad Ponkshe daughter: डॉक्टरची मुलं डॉक्टर तर इंजिनिअरची मुलं इंजिनिअर होत असल्याचे पाहायला मिळत असत. तसेच कलाकाराची मुलं देखील कलाकारच होतात असं चित्र अनेकवेळा दिसून येत आहे. परंतु घरातून तसा कोणताही वारसा नसताना वेगळंच करिअर निवडणं हे खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळत असत. अशीच एक गोष्ट आता बघायला मिळणार आहे.

Sharad Ponkshe FB Post

Sharad Ponkshe FB Post

अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांची लेक सिद्धी पोंक्षे (Siddhi Ponkshe) पायलट झाली आहे. आज त्यांना लेकीचा प्रचंड अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून भावूक भावना व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.

शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धीचे लहानपणापासून ‘पायलट’ होण्याचे स्वप्न रंगवले होते. आज अखेर ते पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या लेकीच्या या यशाचा सर्वात जास्त आनंद वडिलांना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शरद पोंक्षे यांनी सिद्धीचे फोटो पोस्ट करत सांगितले आहे की, ‘कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता चौथीपासून तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तुझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशीलच खात्रीच आहे. लव यू बाळा.’

Abhimaan: पहिले लग्न अन् मग सेलिब्रेशन; ‘अभिमान’ च्या आठवणींना बीग-बी, जया बच्चनकडून उजाळा

जुलै महिन्यामधील त्यांनी सिद्धीला मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) निरोप देत असतानाच फोटो पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं लिहित त्यांनी सिद्धीबरोबरचा फोटो पोस्ट करत सांगितले आहे. परंतु आता मात्र लेक पायटल झाल्यावर सध्या शरद अभिमानाचा क्षण अनुभवत असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पोंक्षे यांना स्नेह आणि सिद्धी अशी दोन मुलं आहेत. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत स्नेहने नुकतेच सिनेमासृष्टीमध्ये एन्ट्री मारली आहे. तर सिद्धी आता प्रायव्हेट पायलट बनल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube