3 Idiots: ३ मित्रांची मैत्री प्रेक्षकांना पुन्हा बघता येणार; ‘3 Idiots’च्या सीक्वेलची शर्मन जोशीने दिली माहिती; म्हणाला

3 Idiots: ३ मित्रांची मैत्री प्रेक्षकांना पुन्हा बघता येणार; ‘3 Idiots’च्या सीक्वेलची शर्मन जोशीने दिली माहिती; म्हणाला

Sharman Joshi On 3 Idiots Sequel : ‘३ इडियट्स’ (3 Idiots) या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. २००९ मध्ये हा चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आमिर खान (Aamir Khan), शरमन जोशी आणि आर माधवन या कलाकारांनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरवला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलची चाहते आता मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याचे दिसत आहे. परंतु आता शरमन जोशीने या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल एक महत्वाची अपडेट दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Blitz Edits (@blitz._.edits)


शरमन जोशीने (Sharman Joshi) एका दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘3 इडियट्स’च्या (3 Idiots) दुसऱ्या भागाविषयी एक मोठी अपडेट दिली आहे. शरमन म्हणाला आहे की,”3 इडियट्स’चा दुसरा भाग आला तर खरचं खूप मजा येणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वेलची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत, राजू सरांना अंदाज आहे. चाहत्यांना निराश करण्याची त्यांची मुळीच इच्छा नाही. दुसऱ्या भागामधील कथानकावर सध्या राजू सरांचं अंतिम टप्प्यात काम आले आहे. यामुळे लवकरच ‘3 इडियट्स’चा सीक्वेल चाहत्यानाच्या भेटीला येणार आहे.

शरमन जोशी पुढे सांगितले आहेत की,”3 इडियट्स’च्या सीक्वेलवर काम करण्यासाठी राजू सर खूप काम करत आहेत. सध्या त्यांचे कथानकावर काम सुरू असल्याने चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कथानकाचं काम पूर्ण झाल्यावर लगेचच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.’3 इडियट्स’ हा चित्रपट २००९ मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. परंतु या चित्रपटात आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव

तसेच करीना कपूर खान, बोमन ईरानी, मोना सिंह आणि ओमी वैद्य हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. ५५ कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाला जगभरात ४६० कोटींची मोठी कमाई केली होती. ‘3 इडियट्स’ हा चित्रपट त्यावेळचा सर्वाधिक कमाई करणारा देशातला पहिला चित्रपट ठरला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या चित्रपटाला समावेश करण्यात आले होते. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आता ‘3 इडियट्स’चा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याने चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube