मुंज्यामध्ये शर्वरीचं ‘बाहुबली’ कनेक्ट! म्हणाली हा एक रोमांचक अनुभव

मुंज्यामध्ये शर्वरीचं ‘बाहुबली’ कनेक्ट! म्हणाली हा एक रोमांचक अनुभव

Sharvari Vagh Connect to Bahublai in Munjya : शर्वरी ही आपल्या देशातील सर्वात आशादायक तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. दिनेश विजनच्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील तिच्या आगामी मुंज्यामध्ये तिने अभिनेता सत्यराजसोबत काम केले आहे. जो बाहुबली मधील कटप्पाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. एसएस राजामौली आणि बाहुबलीची प्रचंड फॅन असलेल्या शर्वरीसाठी हा एक रोमांचक अनुभव होता.

नव्याने सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामण यांच्या पतीचे मोठे विधान

सेटवर पहिल्या दिवसापासून शर्वरी सत्यराजच्या समर्पणाने आणि कलात्मकतेने प्रभावित झाली आणि ज्येष्ठ अभिनेत्याकडून तिला खूप काही शिकायला मिळाले. याबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, “मी राजामौली सरांच्या सर्व कामांची आणि अर्थातच त्यांच्या एपिक कल्ट ब्लॉकबस्टर बाहुबलीची खूप मोठी फॅन आहे. मी दोन्ही चित्रपट अनेकदा पाहिले आहेत. म्हणून, जेव्हा मला पहिल्यांदा कळले की सत्यराज सर मुंज्याचा एक भाग आहे, तेव्हा मी शब्दांपलीकडे उत्साहित झाले .”

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रवेशिकेस मुदतवाढ; या दिवशीपर्यंत करता येणार अर्ज

शरवरी अभिनेत्याला त्याची दृश्ये उत्कृष्टपणे साकारताना पाहून त्यांच्या कडून बरच काही शिकली.ती पुढे म्हणते, “सत्यराज सरांना सेटवर पाहणे हे रोज एखाद्या अभिनय कार्यशाळेत जाण्यासारखे होते. त्यांची अष्टपैलुत्व, संयम आणि निखळ प्रतिभा या सर्व गोष्टींच्या पलीकडे होती. मग तो विनोदी सीन असो किंवा एखादा उत्कट क्षण, सत्यराज सरांनी दृश्यातील सातत्य आणि उत्स्फूर्तता आणली. प्रत्येक दृश्यात जीव टाकला .”

12 लाखांच्या ‘या’ शानदार कारवर मिळत आहे 2.5 लाख रुपये वाचवण्याची संधी; जाणून घ्या ऑफर

या अनुभवामुळे शर्वरीचे अभिनय कौशल्य तर समृद्ध झालेच, पण सिनेमाच्या कलेबद्दलचे कौतुकही ही वाढले. आणि ती या बरोबरच त्यांच्यासोबत आणखी काम करण्याची इच्छा व्यक्त करते.

शरवरी पुढे म्हणाली, “अशा अभूतपूर्व अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि मला आशा आहे की मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळेल.”दिनेश विजन द्वारा प्रस्तुत, चित्रपट ‘मुंज्या’च निर्देशन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. चित्रपटचे निर्माते दिनेश विजान आणि अमर कौशिक आहेत, आणि हे सिनेमाघरांमध्ये 7 जून 2024 ला प्रदर्शित होईल!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube