Kaveri Kapoor: शेखर कपूरची लेक कावेरी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

  • Written By: Published:
Kaveri Kapoor: शेखर कपूरची लेक कावेरी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

Kaveri Kapoor Bollywood Debut: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ज्युरी प्रमुख शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी महोत्सवाच्या सुरुवातीच्या रेड कार्पेट वर स्वतःची अनोखी छाप निर्माण केली आहे. या रेड कार्पेटवर शेखर कपूरसोबत त्यांची मुलगी कावेरी (Kaveri Kapoor) देखील बघायला मिळाली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल आहे. या दोघांच्या एकत्रित दिसण्याने ती आता बॉलीवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kaveri (@kaverikapur)


सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्थ यांची लेक कावेरी कपूर हिच्या बहुप्रतीक्षित पदार्पणाच्या बॉलीवूडमध्ये अनेक वेगवेगळ्या अफवा होत आहेत. अभिनय आणि गायन या दोन्ही गोष्टींमध्ये काटेकोरपणे प्रशिक्षण घेतलेली कावेरी ही मनोरंजन इंडस्ट्रीतील चाहत्यांमध्ये जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. ती आगामी बॉलीवूड प्रॉडक्शनमध्ये मुख्य भूमिका करणार का? अश्या अनेक चर्चा होत असल्याचे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार की, महत्वाकांक्षी कलाकार तिच्या वडिलांचा आदरणीय वारसा पुढे नेण्यास उत्सुक झाली आहे. गायक-गीतकार आणि आघाडीच्या जागतिक निर्मात्यांसह एक सहयोगी म्हणून निपुण ती सध्या बोस्टनमधील बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये तिचे संगीत कौशल्य वाढवत आहे. जगभरातील अनेक निर्मात्यांसोबत सातत्यपूर्ण सहकार्याने तिचे उद्योगक्षेत्रातील अनोखं स्थान अधोरेखित केले आहे. लवकरच ती बॉलीवूडमध्ये ती प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केलं ‘झिम्मा 2’चे शूटिंग?; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

कावेरी कपूरने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. इंडस्ट्रीच्या एका सूत्रांच्या माहितीनुसार, “ती हिंदी चित्रपटसृष्टीच्या स्पर्धात्मक क्षेत्रात तिच्या लॉन्चपॅड म्हणून काम करू शकणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी चर्चेत आहे. कावेरी वर्कशॉप्समध्ये भाग घेत आहे आणि तिच्या पात्रासाठी जोरदार तयारी करतआहे. एका मोठ्या चित्रपटाची घोषणा लवकरच करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube