‘देसी गर्लनंतर शेखर सुमनचा बॉलिवूडवर धक्कादायक आरोप’; म्हणाला…
Shekhar Suman On Bollywood: ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) अलीकडेच बॉलीवूडने तिला कसे बाजूला केले याचा मोठा खुलासा केला. प्रियांकाच्या या खुलाशानंतर कंगना राणौतपासून अमाल मलिक आणि अपूर्व असरानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी बी- टाऊनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचवेळी शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी दावा केला आहे की, मला आणि त्यांच्या मुलाचे गँग- अप झाले आहे आणि अनेक प्रोजेक्टमधून त्यांना बाहेर काढून टाकण्यात आले होते.
ट्विट करून हा खुलासा केला
त्रिदेव अभिनेत्याने गुरुवारी त्याच्या ट्विटर हँडलवर सांगितले आहे की, लोकांनी त्याच्या आणि त्याचा मुलगा अध्यान यांच्या विरोधात गँग- अप काढली. शेखरने लिहिले की, “मी इंडस्ट्रीतील किमान 4 लोकांना ओळखतो ज्यांनी मला आणि अध्यायनला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकले आहे मला हे नक्की माहीत आहे. या ‘गुंड’ लोकांचा वावर खूप असतो आणि ते खूप मोठे लोक आहेत. पण सत्य देखील आहे की ते माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात अडथळे आणू शकतात, पण ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत.
I know of atleast 4ppl in the industry who have ganged up to have me n adhyayan removed from many projects.i know it for sure.These 'gangsters' have a lot of clout and they are more dangerous than a rattle snake.But the truth is they can create hurdles but they cannot stop us.
— Shekhar Suman (@shekharsuman7) March 30, 2023
सुशांत सिंग देखील गँगअपचा ठरला बळी
शेखरने आणखी एका ट्विटमध्ये केले आहे की, “प्रियांका चोप्राचा खळबळजनक खुलासा धक्कादायक नाही. चित्रपट उद्योगात टोळ्या कशा चालतात हे सर्वश्रुत आहे. हे सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत देखील असेच घडले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इंडस्ट्रीत असेच घडते. घ्या किंवा सोडा. आणि प्रियांकाने निघायचे ठरवले. आता आमच्याकडे हॉलिवूडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा खरा-निळा ग्लोबल आयकॉन आहे. प्रत्येक ढगात आशेचा किरण असतो असे म्हणतात. शेखर सुमनच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा बॉलिवूडचे काळ्या धंद्यांचे सत्य समोर येत आहे.
दमदार अॅक्शन, डायलॉग्स अन् कहाणीत ट्विस्ट; ‘छत्रपती’ चा टीझर पाहिलात का?
कोण आहे शेखर सुमन ?
शेखर सुमन यांनी 1984 मध्ये ‘उत्सव’ या ‘शृंगारिक’ नाटकातून करिअरला सुरुवात केली. यानंतर या अभिनेत्याने ‘रहगुजार’, ‘संसार’, ‘वो फिर आएगी’, ‘रणभूमी’, ‘चोर मचाये शोर’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा शेवटचा चित्रपट २०१७ मधील अॅक्शन ड्रामा भूमी होता, ज्यामध्ये संजय दत्त आणि अदिती राव हैदरी यांनी देखील अभिनय केला होता. दरम्यान, अध्यायन सुमन ‘हाल-ए-दिल’, ‘राझ-द मिस्ट्री कंटिन्यूज’, ‘हार्टलेस’ आणि ‘इश्क क्लिक’मध्ये दिसून आली होती.