‘बॉडीगार्ड’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराने निधन, इंडस्ट्रीवर शोककळा

‘बॉडीगार्ड’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराने निधन, इंडस्ट्रीवर शोककळा

Director Siddique Dies: सलमान खानचा ‘बॉडीगार्ड’ चित्रपट दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक सिद्दिकी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी सिद्दीकी यांनी जगाचा निरोप घेतला. सिद्दीकी यांना आदल्या दिवशी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे आज म्हणजेच मंगळवारी त्यांचे निधन झाले.

ही बातमी समोर आल्यानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनाही सिद्दिकीचा मृत्यू पचवता आला नाही. सोशल मीडियावर साऊथपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक कलाकरांनी सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहायली आहे.

बीसीसीआयने यंदा भरला 1159 कोटींचा आयकर, पाच वर्षांतील आकडेवारी जाहीर

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सिद्दीक यांना घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले होते, पण जिथे त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती. त्यानंतर त्याला ECMO वर ठेवण्यात आले होते. सिद्दीकी यांच्यावर यकृताशी संबंधित समस्या आणि न्यूमोनियावरही उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सिद्दीकी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान देणार राजीनामा; असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस

सिद्दीकीची कारकीर्द
मल्याळम दिग्दर्शक सिद्दीकीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1983 मध्ये आलेल्या ‘फासिल’ चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शन केले होते. सिद्दिकी यांनी त्यांचा मित्र लाल सोबत मल्याळम चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले, ज्यात हरिहर नगर, गॉडफादर, व्हिएतनाम कॉलनी आणि रामजी राव स्पीकिंग या चित्रपटांचा समावेश आहे. मल्याळम व्यतिरिक्त सिद्दीकी यांनी हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube