Sidharth Aanand यांना चाहत्यांची खास विनंती; पठाण 2 चे दिग्दर्शन कराणार?

Sidharth Aanand यांना चाहत्यांची खास विनंती; पठाण 2 चे दिग्दर्शन कराणार?

Sidharth Aanand will direct Pathan 2 : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ( Sidharth Aanand ) ‘पठाण’ ( Pathan ) या चित्रपटाद्वारे 2023 ची सुरुवात धमाकेदारपणे केली होती तर 2024 ची सुरुवात ‘फाइटर’ ( Fighter ) या 2024 चा पहिला सुपरहिट चित्रपट म्हणून झाली होती. आता पठाणच्या सीक्वलबद्दल चर्चा सुरू असतानाच सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करावं अशी मागणी त्यांचा फॅन्स ने केली आहे.

Ashok Chavan News :”और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

पठाणच्या सीक्वलचे दिग्दर्शन मात्र सिद्धार्थ आनंद हे करणार नाहीत. त्यामुळे ब्लॉकबस्टर हिट ‘पठाण’च्या सिक्वेलचे नेतृत्व करण्यासाठी चाहते त्यांना कळकळीने विनंती करत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर सिद्धार्थ आनंद यांनी सिक्वलचे दिग्दर्शन करावे आणि शाहरुख खानसोबत पुन्हा एकदा सोबत काम करावं अशी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे.

स्केल, ॲक्शन ब्लॉक्स, सिनेमॅटोग्राफी या बाबतीत सिद्धार्थ आनंद हे अलीकडच्या काळातील सर्वोत्कृष्ट ॲक्शन डायरेक्टर बनले आहेत. आम्ही #पठानला त्याच्या दिग्दर्शनाखाली ऑल टाईम ब्लॉकबस्टरसह इतिहास रचताना पाहिले आहे म्हणून आम्हाला #पठान2 मध्ये पुन्हा सिद्धार्थ आनंद हवे आहेत” SRK चाहत्यांपैकी एकाने नमूद केले “लॉर्ड सिड प्लीज पठाण 2 डायरेक्ट किजिये तुमची दिशा फक्त फायटर वॉर पठाण बँगबँग तुमच्यापेक्षा SRK पठाण म्हणून कोणीही सादर करू शकणार नाही”

विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्यातील अफलातून केमिस्ट्री; ‘दो और दो प्यार’ मधील गाणे रिलीज

सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ने जगभरात ₹1,000 कोटींहून अधिक कमाई केली आणि ॲक्शन प्रकारातील त्याच्या दिग्दर्शनाच्या पराक्रमाची प्रचंड प्रशंसा केली. ‘बँग बँग’, ‘वॉर’, ‘पठाण’ आणि आता ‘फायटर’ यांसारख्या चित्रपटांमधून यशस्वी सिनेविश्व प्रस्थापित करण्याच्या कौशल्यासाठी ओळखला जाणारा सिद्धार्थ आनंद याला अपवाद ठरतो का ? हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. दरम्यान सिद्धार्थ आनंद सध्या ‘फायटर’ च सुपरहिट यश साजर करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज