फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचं मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत
Social Media Star Karan Sonavane Debut in Marathi cinema : आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्रामवर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार (Social Media Star) करण सोनावणे (Karan Sonavane) उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर हिंदी सोबत मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण (Debut) करण्यास सज्ज झाला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा मणिपूर दौऱ्यावर; गोळीबारातील प्रभावित लोकांची घेतली भेट
करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित, कॉमेडी ने भरपूर, अतिशय यूनिक कथा असलेला ‘एक दोन तीन चार’ ह्या नव्या मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजक करताना दिसणार आहे. निर्मात्यांनी आज करण केंद्रित एक खास टीझर रिलीज केला आहे, ज्यात करण चे धमाकेदार पंचलाइन खळखळुन हसवायला भाग पाडत आहेत.
वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘एक दोन तीन चार’ ह्या चित्रपटात वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारीबरोबर इतर कलाकार जसे मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर दमदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे ह्या सर्वांसोबत करण ची जुगलबंदी नक्की कशी जमते हे बघणं रोमांचक ठरणार आहे. तसेच नक्की ह्या क्युट लव्हस्टोरी मध्ये काय गोधळ चाललंय हे हि आपल्याला पाहायला मिळेल.
जिओ स्टुडिओज प्रस्तूत, एक दोन तीन चार चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे. तर आपल्या लाडक्या करणचा एक दोन तीन चार चित्रपटातील अद्भुत प्रवास अनुभवायला सज्ज व्हा १९ जुलैला, आपल्या जवळच्या सिनेमागृहात !!!