चाहत्यांना धक्का, सोशल मीडिया स्टार मीशा अग्रवालने घेतला जगाचा निरोप, मृत्यूचे कारण अस्पष्ट

चाहत्यांना धक्का, सोशल मीडिया स्टार मीशा अग्रवालने घेतला जगाचा निरोप, मृत्यूचे कारण अस्पष्ट

Misha Agarwal Death : सोशल मीडिया स्टार मीशा अग्रवाल (Misha Agarwal Death) हिचं वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वी तिने जगाचा निरोप घेतल्याने सोशल मीडियावर (Social Media) एकच खळबळ उडाली आहे. ती आज (26 एप्रिल) 25 वा वाढदिवस साजरा करणार होती मात्र दोन दिवसापूर्वी तिने जगाचा निरोप घेतला. याबाबत मिशा अग्रवालच्या कुंटुंबाने माहिती दिली आहे.

कुटुंबाने मीशा अग्रवालच्या निधनाची माहिती तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केली आहे. जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की आमची लाडकी मीशा आता आमच्यात नाही. तुम्ही तिला दिलेल्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. तिला तुमच्या आठवणींमध्ये आणि प्रार्थनांमध्ये जिवंत ठेवा असं कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

मीशाच्या निधनाची माहिती समोर येताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला चाहत्यांना हा एक प्रॅंक किंवा स्टंट वाटले मात्र नंतर या बातमीची पुष्टी होताच सोशल मीडियावर अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली. एकाने लिहिले की, ही बातमी खोटी असेल, ती खूप सुंदर होती आणि टॅलेंटेड होती. तर दुसऱ्याने लिहिले अजूनही विश्वास बसत नाहीये… ती नेहमीच आठवणीत राहणार.

 

View this post on Instagram

 

A post shared by Misha Agrawal (@themishaagrawalshow)

मृत्यूचे कारण अस्पष्ट

तर दुसरीकडे मीशा अग्रवालच्या मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून मृत्यूमागील कारण समोर यावं यासाठी मागणी होत आहे. मीशा अग्रवाल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. तिचे इंस्टाग्रामवर 3,00,000 हून अधिक फॉलोअर्स होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Misha Agrawal (@themishaagrawalshow)

Iran Port Blast : मोठी बातमी! इराणच्या बंदरात स्फोट, 500 हून अधिक लोक जखमी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube