Spider-Man: Brand New Day ची भारतात विक्रमी कमाई; अवघ्या चार दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Spider-Man: Brand New Day: चार दिवसांत या चित्रपटाने 309 कोटी रुपयांची कमाई करत भारतातील हॉलीवूड चित्रपटांसाठीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • Written By: Published:
Spider Man

Spider-Man: Brand New Day : टॉम हॉलंड अभिनीत ‘Spider-Man: Brand New Day’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचलाय प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने 309 कोटी रुपयांची कमाई करत भारतातील हॉलीवूड चित्रपटांसाठीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कमाई करणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हॉलीवूड चित्रपट ठरला आहे.

अमेरिकेतील प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला. स्पायडर-मॅन चाहत्यांच्या उत्साहामुळे रविवारी चित्रपटाने सर्वाधिक 93 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली.

चित्रपटाने केलेले विक्रम
भारतात प्रदर्शित झालेल्या कोणत्याही हॉलीवूड चित्रपटाचा सर्वाधिक ओपनिंग वीकेंड
भारतीय आणि हॉलीवूड चित्रपटांचा एकत्रित विचार करता भारतीय बॉक्स ऑफिस इतिहासातील टॉप 10 सर्वात मोठ्या ओपनिंग वीकेंडमध्ये स्थान
2026 मध्ये भारतात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड
भारतात 300 कोटी रुपयांचा टप्पा सर्वात वेगाने पार करणारा हॉलीवूड चित्रपट
5,000 हून अधिक स्क्रीन्सवर विक्रमी प्रदर्शन

Sony Pictures Entertainment India ने हा चित्रपट भारतात 5,000 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित केला असून, हा भारतातील हॉलीवूड चित्रपटाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज मानला जात आहे. चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रीमियम तसेच नियमित थिएटर्समध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी हाऊसफुल शो सुरू आहेत.

स्पायडर-मॅन फ्रँचायझीची भारतातील लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून, सर्व वयोगटातील आणि विविध भाषांतील प्रेक्षकांनी या सुपरहिरो चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाच्या विक्रमी कमाईचा वेग पाहता येत्या काही दिवसांत तो आणखी अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us