टीव्ही ते चित्रपट Ankita Lokhande ने साकारलेल्या अभूतपूर्व भूमिकांची गोष्ट
Story of Ankita Lokhande played role TV to Film : अभिनेत्री अंकिता लोखंडेने ( Ankita Lokhande ) बॉलीवूड जिंकण्यासाठी टेलिव्हिजनमधून ( TV to Film ) पुढे येऊन तिने उत्तम भूमिका साकारल्या. तिने निवडलेल्या स्क्रिप्ट्सबद्दल ती निवडक आहे. तिने निवडलेल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ती चमकली. दूरचित्रवाणीपासून ते बॉलीवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास आजही सुरूच आहे.
तिचा बॉलिवूड डेब्यू ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ पासून झलकारी बाई म्हणून अंकिताने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचेही प्रेम आणि प्रशंसा मिळवली आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. तिच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या अलीकडील चित्रपटाने अंकिताची पिरियड ड्रामासाठी पहिली पसंती म्हणून तिचा दर्जा आणखी मजबूत केला कारण तिने यमुनाबाई सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्धी मिळवली.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला 24,960 रुपये पगार
आता ‘आम्रपाली’ या आगामी वेब शो मधून ती आयकॉनिक कामगिरी सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. अंकिता संदीप सिंगच्या प्रॉडक्शन व्हेंचरमध्ये शाही गणिकेची भूमिका साकारणार आहे. तत्पूर्वी.तिने व्यक्त केले की असे भाग घेण्यास ती घाबरते. तिच्या फिल्मोग्राफीचा विचार करत एक गोष्ट निःसंशयपणे म्हणता येईल की अंकिता काही प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यात यशस्वी झाली आहे. तिची जिद्द, मेहनत, प्रशिक्षण आणि तिच्या कलाकुसरबद्दलची नेहमीच तिचं कौतुक होत. अंकिता लोखंडेच्या ‘आम्रपाली’ बद्दल आता सगळ्यांना उत्सुकता आहे.