वर्दीत दिसणार सुबोध भावे! ‘कैरी’ तील महत्त्वपूर्ण भूमिकेतून गाजवणार मोठा पडदा
Subodh Bhave हा आगामी 'कैरी' या मराठी चित्रपटात फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेचा पहिला लूक समोर आला आहे.
Subodh Bhave on the big screen with an important role of Foreign police in ‘Kairi’ : पोलिसांची वर्दी सांभाळणं हे अर्थात अभिमानास्पद आहे. आणि हा अभिमान अभिनेता सुबोध भावेलाही जपावा असं नेहमी वाटायचं. बऱ्याच मुलाखतींमध्ये पोलीस व्हायचं स्वप्न होतं असं ते म्हणाले आहेत. आणि त्याचं हे स्वप्न ते अभिनय क्षेत्रात अभिनयाच्या वाटे पूर्ण करत आहेत. आगामी ‘कैरी’ या मराठी चित्रपटात सुबोध भावे पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
सेबीकडून ट्रेडिंग गुरूवर कारवाई! 546 कोटींची सर्वांत मोठी जप्ती करण्यात आलेले अवधूत साठे नेमके कोण?
पोलिसांच्या भूमिकेत काम करायचं स्वप्न ते या चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहेत. फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत ते या चित्रपटात दिसले. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमधील त्यांची ही करारी भूमिका चाहत्यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची उत्सुकता वाढवत आहे.
ब्रेकिंग : नगरपंचायत अन् नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टानं मागणी फेटाळली
‘कैरी’ सिनेमातील भूमिकेबाबत बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “यंदा हिवाळ्यातच आपणा सर्वांना कैरी चाखायला मिळणार आहे. आणि ही कैरी आंबट-गोड वा नेमकी कशी असणार हे मात्र 12 नोव्हेंबरला कळेल. कारण माझा ‘कैरी’ हा आगामी सिनेमा भेटीस येतोय. मी या चित्रपटामध्ये फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत असणार आहे.
