Suniel Shetty: टोमॅटो दरवाढ वक्तव्याप्रकरणी अखेर अभिनेत्याला मागावी लागली माफी! म्हणाला…

Suniel Shetty: टोमॅटो दरवाढ वक्तव्याप्रकरणी अखेर अभिनेत्याला मागावी लागली माफी! म्हणाला…

Suniel Shetty On Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य कुटुंबापासून ते बॉलिवूड (Bollywood)  स्टार्सच्या कुटुंबापर्यंत सर्वानाच याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर (Social media) सध्या टोमॅटोवरच चर्चा रंगत असल्प्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) देखील टोमॅटोच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता व्यक्त करत टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम त्याच्या स्वयंपाक घरावर होत असल्याचे वक्तव्य त्याने केले होते. त्यामुळे तो टोमॅटो कमी खायला लागला आहे, असे सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)


परंतु आता सुनील शेट्टीचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. यावरून काही लोक त्यांच्यावर शेतकरी विरोधी असल्याचा ठपका ठेवत आहेत. त्याच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असल्याने अखेर सुनील शेट्टी याने याप्रकरणी माफी मागितली आहे. सुनील शेट्टी याने नकळत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे. अभिनेत्याने यावर स्पष्टीकरण देत असताना सांगितले आहे की, त्याच्या बोलण्याचा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. आपण नेहमीच शेतकऱ्यांना साथ देत असतो आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करण्याची कल्पना देखील करू शकत नाही.

सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, त्याने नेहमी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काम केले आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल, अशी त्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आपला हॉटेल व्यवसाय असल्याने शेतकरी नेहमी त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत आणि त्यांच्याशी त्याचा थेट संबंध येत असल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले आहे.

माफी मागत असताना सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, ‘मी कुठल्याच वाईट हेतूने काही बोललो नाही. परंतु तरीही त्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बोलण्याचा विचार मी स्वप्नात देखील करू शकत नाही. कृपया माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका. अशी पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

गेल्या काही दिवसापासून सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य करत असताना म्हटले होते की, त्याची बायको ताजी भाजी खायला मिळावी म्हणून एकावेळी फक्त २-३ दिवसांची भाजी खरेदी करत असत. परंतु आता टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या भावाचा परिणाम आता त्याच्या स्वयंपाकघरावर होत असल्याचे देखील सांगितले होते. भाव वाढल्याने आजकाल आमच्या घरात देखील टोमॅटो कमी खाल्ले जात आहेत, असे त्याने सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube