Sunil Pal : कॉमेडियन सुनिल पाल शोसाठी गेले पण परतलेच नाही, पत्नीची पोलिसांत तक्रार…

Sunil Pal : कॉमेडियन सुनिल पाल शोसाठी गेले पण परतलेच नाही, पत्नीची पोलिसांत तक्रार…

Sunil Pal News : कॉमेडियन सुनिल पाल (Sunil Pal) बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर आलीयं. सुनिल पाल हे आपल्या शोसाठी मुंबईच्या बाहेर गेले होते, मात्र, ते परत घरी आले नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसांत दाखल केलीयं. त्यांचा फोनही मागील अनेक तासांपासून बंद असल्याचं पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलंय.

महायुती सरकारचा भव्य शपथविधी! उद्धव ठाकरेंसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री, बडे नेते अन् संत महंतांनाही निमंत्रण

कॉमेडियन सुनिल पाल मागील अनेक तासांपासून बेपत्ता असून त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केलीयं. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात सुनिल पाल यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली असून पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आलायं. आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या कॉमेडीयन शब्दांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडलीयं. त्यांनी अपना सपना मनी मनी, फिर हेरा फेरी, बॉम्बे टू गोवा, किक सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube