Gadar 2 : ‘उड जा काले…’ म्हणत तारा सिंग अन् सकिना पुन्हा एकमेकांच्या प्रेमात!
Gadar 2 Udd Jaa Kaale Kaava Song Release: तारा आणि सकिना यांची सर्वात भारी प्रेमकथा पुन्हा एकदा ‘गदर 2’ मध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाबद्दल मोठ्या उत्सुकतेने रिलीजची वाट पाहत आहेत. ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा पहिला भाग आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मूळ चित्रपटात, सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या अमेझिंग लव्हस्टोरीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाची कथा जेवढी प्रेक्षकांच्या मनाला भिडली तेवढीच त्याची गाणी देखील खूप गाजली आहेत.
‘मैं निकला गड्डी लेकर’ आणि ‘उड जा काळे कावा’ चार्टबस्टर्समध्ये अव्वल ठरले होते. यावेळी मात्र 22 वर्षांनंतर निर्मात्यांनी ‘गदर 2’ मधील ‘उड जा काळे कावा’ ची नवीन गाणे रिलीज केली आहे.या गाण्यामध्ये सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिना यांच्या रूपात एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांची केमिस्ट्री पाहून तुमचं मन नक्कीच गमावलं जाणार आहे. यासोबत ‘उड जा काळे कावा’ने 22 वर्षांपूर्वी आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलची रोमँटिक शैली पुन्हा एकदा पसंत केली जात आहे.
उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गदर एक प्रेम कथाचे मूळ गाणे ‘उड जा काळे कावा’ हे त्यांच्या आवाजाने आयकॉनिक बनवले होते. तर मिथुनने या नव्या गाण्याला पुन्हा एकदा नव्या स्वरूपात मांडण्यात आला आहे. मूळ गाणे उत्तम सिंग यांनी रचले होते आणि गीत आनंद बक्षी यांनी लिहिले होते.
‘उड जा काळे कावा’ची या नव्या गाण्याची झलक रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. युजर्सना हे गाणे खूप आवडले आहे, यामुळे या गाण्यावर जोरदार कमेंटही पडत आहेत. या गाण्याला रिलीज झाल्यानंतर 2 तासांत 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तारा आणि सकिना यांची जादुई केमिस्ट्री पाहून चाहते खूप खूश आहेत.
Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल
‘गदर 2’ बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल आहे. ‘गदर 2’ मध्ये सनी देओल आणि अमिषा पाटल देखील मुख्य भूमिकेत आहेत. गदर एक प्रेम कथाने 22 वर्षांपूर्वी 100 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला होता. ‘गदर 2’कडून निर्मात्यांनाही अशाच अपेक्षा आहेत.