Salaar Teaser : आदिपुरूषनंतर सुपरस्टार प्रभास पुन्हा सज्ज; बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज, पाहा…

Salaar Teaser : आदिपुरूषनंतर सुपरस्टार प्रभास पुन्हा सज्ज; बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज, पाहा…

Salaar Teaser Release : आदिपुरूष चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्यानंतर आता दाक्षिणात्या सुपरस्टार अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट सज्ज झाला आहे. त्याच्या सालार या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये जबरदस्त स्टंटसह प्रभास दमदार भूमिकेत दिसत आहे. प्रभाससह दिग्गज अभिनेते टीनू आनंद आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या हाय होल्टेज अॅक्शनने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ( Superstar Prabhas Movie Salaar Teaser Release )

हा चित्रपट 28 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘सालार : द सीज फायर पार्ट-1’ असं आहे. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं दकील बोलंल जात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केजीएफ पार्ट वन आणि टू या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केलं आहे.

‘पवार विरुद्ध पवार’ खेळात अजितदादा सध्या तरी वरचढ!

दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रभास या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभाससह टीनू आनंद पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हसन आणि जगपति बाबू यांच्या देखील महत्त्वाच्या भूम्का असणार आहेत. तर हा चित्रपट कन्नड़, तमिळ, तेलुगू आणि मल्याळमसह हिंदीमध्ये पॅन इंडिया हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.

शिंदेंचे किती आमदार परतणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला

प्रभासच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टीझरला काही तासांतच मिलियन्समध्ये व्ह्युज मिळाले आहेत. चाहत्यांचा या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube