सुरुची अडारकर दिसणार नव्या भूमिकेत; ‘छोट्या बायोची मोठी स्वप्न’मधून प्रेक्षकांच्या भेटीला

सुरुची अडारकर दिसणार नव्या भूमिकेत; ‘छोट्या बायोची मोठी स्वप्न’मधून प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेरणा जंगम

Chotya Bayochi Motthi Swapna: शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Motthi Swapna) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत (Marathi Serial) आपल्याला पाहायला मिळतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝑺𝒖𝒓𝒖𝒄𝒉𝒊 N 𝑨𝒅𝒂𝒓𝒌𝒂𝒓 (@suruchiadarkar)

आता मालिकेत सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) हिची एन्ट्री होणार आहे. अनू देसाई असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून ती शिक्षिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. ती पहिल्यांदाच शिक्षिकेच्या भूमिकेत टेलिव्हिजनवर येते आहे. भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो आणि तिची आई भारती यांच्या आयुष्यात शुभंकरच्या येण्याने चांगले दिवस आणले. पण आता भारतीच्या जाण्याने बयोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय शुभंकरदेखील बायोसोबत काही काळ नव्हता. या धक्क्यांतून बयो कशी सावरेल, तिला तिची स्वप्नं पूर्ण करता येतील का? हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे.

आता शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात काय बदल होतील, हे पाहायला मिळेल. बयोचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता कसे पूर्ण होईल. तिचा सगळ्यांत मोठा आधार तिच्यासोबत नसणार आहे आणि आता शुभंकर तिची काळजी कशी घेईल हेही पाहता येईल. आता शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला असून तिच्या येण्याने बयोला कशी मदत होईल, हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

सुरुचीच्या चाहत्यांसाठी तिला टेलिव्हिजनवर पुन्हा पाहणे हे मजेशीर असणार आहे. मालिकेत तिची एन्ट्री झाली आहे आणि आता बयोच्या आयुष्यातील हे वळण तिला पुढे कसे मदत करेल, हे पाहायला मिळेल. सुरुचीच्या नव्या पेहेरावाची चर्चा पाहायला मिळते आहे. शिक्षिकेच्या भूमिकेत ती पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर दिसते आहे. बयोचे डॉक्टर व्हायचे स्वप्न कसे पूर्ण होणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube