चित्रपटांसोबतच बिझनेसमध्ये नशीब आजमावणारे स्टार्स; पहा स्टार्सची यादी
Bollywood Stars : बॉलीवूड कलाकारांकडे पैशांची कमतरता तर नाहीच त्याचसोबत त्यांची बिजनेस केमिस्ट्री सुद्धा चांगलीचं मिळती जुळती आहे. काही सिनेस्टार्स हे फक्त ग्लॅमरच्याच दुनियेत नाही तर व्यवसायाच्या जगातही त्यांचा ठसा उटवत आहेत.
आपले बॉलिवूड कलाकार हे फक्त आता चित्रपट व्यवसायापुरतेस मर्यादित राहिलेले नसून त्यांनी इतर व्यवसायातही त्यांचं नशीब आजमावलं आहे. अलीकडच्या काळात असे अनेक स्टार्स आहेत जे बिजनेस मध्ये चांगलं नाव मोठं करत आहेत. त्यांचा बिजनेस हा देश विदेशात सुद्धा पसरलेला आहे. बॉलीवूड मधील असे कोणते स्टार्स आहेत ज्यांनी बिजनेसमध्ये आपला ठसा उमटवला आहे, त्याबद्दल माहिती देणार हा लेख पूर्ण वाचा.
90 च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लॉसिस नावाच्या स्पा आणि सलून चेनची सह- मालक आहे. या सोबतच तिच्याकडे मुंबईच्या रॉयल्टी क्लबची ही मालकी आहे. 2008 पर्यंत शिल्पा राजस्थान रॉयल्स ची सुद्धा सह मालक होती. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी अभिनेत्री सुष्मिता सेनचा मुंबईत स्वतःच रेस्टॉरंट आहे. ‘बंगाली मॅशिस किचन’ असे रेस्टॉरंटचे नाव आहे आणि त्यात पारंपरिक बंगाली पदार्थ मिळतात. यासोबतच सुष्मिताचे दुबई दागिन्यांचे शोरूमही आहे.
अभिनयासोबतच रितिक रोशन HDX नावाच्या कपड्यांच्या ब्रँडचा मालक आहे. ही कंपनी ब्रँड आणि सॉफ्टवेअर्स बनवते. पण HDX कंपनीने आता इतर कपडेही बनवण्यास सुरुवात केली आहे.
अभिनेता अर्जुन रामपाल हा आधी मॉडेल नंतर अभिनेता आणि आता बिझनेसमॅन बनला आहे. दिल्लीत त्याचा लाऊंज बार आहे. या बार च नाव LAP आहे. किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खानने LAP लाउंजच्या फर्निचरची योजना केली आहे. यासोबतच अर्जुनची ‘चेसिंग गणेशा’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुद्धा आहे.
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे एकेकाळी बॉलीवूडमध्ये डान्सर म्हणून प्रसिद्ध होते. तर आज ते हॉटेल चीनचे मालक आहेत. मोनक ग्रुपच्या अंतर्गत उटी आणि मसूरी यांसारख्या शहरांमध्ये अनेक पर्यटन स्थळांमध्ये मिथुन चे हॉटेल आहेत.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री सनी लिओनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनी लिओनी हा IMBesharam.com वेबसाइटचा ब्रँड चेहरा आहे. हे एक ऑनलाइन प्रौढ स्टोअर आहे. येथे तुम्हाला प्रौढ खेळण्यांपासून ते स्विमवेअरपर्यंत इतर कपडे आणि उपकरणे देखील मिळतात.