Tamannaah Bhatia: अखेर बाहुबली फेम तमन्नाने दिली प्रेमाची जाहीर कबुली, म्हणाली…

Tamannaah Bhatia: अखेर बाहुबली फेम तमन्नाने दिली प्रेमाची जाहीर कबुली, म्हणाली…

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) अखेर तिच्या विजयसोबतच्या नात्यालाबद्दल जाहीर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. या दोघांना अनेकवेळा एकत्र बघतले गेले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तमन्ना विजयबरोबरच्या (Relationship) नात्याविषयी स्पष्ट केले आहे. ‘बाहुबली’ (Bahubali) फेम तमन्नाने या मुलाखतीमध्ये विजय वर्माबद्दलचे प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


हे दोघं लवकरच ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी सिनेमात एकत्र झळकणार असल्याची चर्चा होत आहे. दोघांचा एकत्र हा पहिला प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. त्याअगोदर नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजयला गोव्यातील एका पार्टीच्या दरम्यान एकमेकांना किस करत असताना बघितलं गेलं होतं. किसिंगचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तमन्ना विजयबद्दल सांगितले आहे की, मला वाटत नाही की तुम्ही एखाद्याकडे यासाठी आकर्षित होऊ शकता, कारण तो तुमचा सहकलाकार आहे.

माझे अनेक सहकलाकार होते. माझ्या मते एखाद्याच्या प्रेमात पडणं किंवा एखाद्यासाठी मनात काहीतरी भावना येणं ही नक्कीच अत्यंत वैयक्तीत बाब आहे. ते काय काम करत आहेत, याच्याशी त्याचं काहीच घेणं-देणं नसत. एखाद्याची नोकरी किंवा व्यवसाय बघून प्रेम केलं जात नाही. ती एक अशी व्यक्ती आहे, ज्याच्याकडे मी खरंच सकारात्मकतेने बघत असते. त्याच्याशी माझी मैत्री अत्यंत सहजपणे  उत्तम प्रकारे जमली आहे. तोसुद्धा अत्यंत सहजपणे माझ्याकडे आला होता. यामुळे मला देखील कोणतीही पर्वा न करता या मैत्रीची सुरुवात करता आली. ज्या महिलांनी करिअरमध्ये खूप काही यश संपादित केले आहे, त्यांच्याबाबत मोठ्या समस्या असतात.

आम्हाला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत केली पाहिजे. पण जर एखादी गोष्ट खूप साधी असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच कायम राहा. भारतात अशी काही लोकांची विचारसरणी आहे की, एखाद्या व्यक्तीसाठी महिलेला तिचं संपूर्ण आयुष्य बदलावं लागत आहे. जोडीदारासाठी तुम्हाला तुमचे घर सोडावे लागत आहे. त्या व्यक्तीकरिता अनेक गोष्टी कराव्या लागत असतात. पण माझ्यासाठी मी एक विश्व तयार केलं आहे आणि ही (विजय वर्मा) एक अशी व्यक्ती आहे, ज्याने माझ्या कोणत्याही विशेष प्रयत्नांशिवाय मला आणि माझ्या विश्वाला समजून घेतले जात आहे.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

त्या व्यक्तीची मी खूप काळजी घेत आहे, तो माझ्या प्रत्येक आनंदाचं कारण बनला आहे, अशा शब्दांमध्ये ती पुढे व्यक्त झाली. 33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या सिनेमातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ सिनेमासृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तर 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये ‘चटगांव’ या सिनेमातून कारकिर्दीची सुरुवात केली होती. गली बॉय या सिनेमातून त्याला लोकप्रियता मिळाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube