Zapatlela 3: ओम फट्ट स्वाहा! महेश कोठारेंचा ‘झपाटलेला 3’चा धमाकेदार टीझर रिलीज

Zapatlela 3: ओम फट्ट स्वाहा! महेश कोठारेंचा ‘झपाटलेला 3’चा धमाकेदार टीझर रिलीज

Zapatlela 3 Teaser: मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या ‘झपाटलेला’ या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. महेश कोठारे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचं गारूड संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवर कायम असून आता त्याचा तिसरा भाग देखील रिलीज होणार आहे. ‘झपाटलेला 3’ (Zapatlela 3) या सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली आहे.


‘झपाटलेला’, ‘झपाटलेला 2’ या दोन कलाकृती दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनीच ‘झपाटलेला 3’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. रजनीश खनुजा (सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज) आणि महेश कोठारे (जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल) यांच्या संयुक्त विद्यमानातून या हलक्या सिनेमाची निर्मिती केली जात आहे.

तात्या विंचू नव्या रुपात येणार

‘झपाटलेला 3’चं मुख्य आकर्षक असणार आहे तो प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे. यावेळीही आदिनाथ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनोरंजनाच्या एका अनोख्या विश्वात घेऊन जाणार आहे. तसेच रसिक प्रेक्षकांनी ज्याच्यावर मनापासून खरं प्रेम केलं किंवा ज्याचा मोठा धसका घेतलाय असा तात्या विंचू देखील या सिनेमात आणखी नव्या एनर्जीनं बघायला मिळणार आहे. अर्थात या दोघांच्या जोडीला आणखी एक जबरदस्त नवीन पात्र या सिनेमात बघायला मिळणार आहे. हे पात्र ‘झपाटलेला 3’चा प्रवास आणखी वेगवान आणि मनोरंजक असणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितलं आहे की, “झपाटलेला सिनेमाच्या फ्रॅंचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किमबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील सिनेमा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. ‘झपाटलेला 3’च्या कथानकाची भट्टी एकदम जमून आली असून हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक धमाल प्रवास असणार आहे.

World Earth Day निमित्त युनोच्या जागतिक उपक्रमात भूमीचा सहभाग…

निर्माते रजनीश खनुजा ‘झपाटलेला 3’ बद्दल म्हणाले की, “या सिनेमाने निर्माण केलेलं विश्व आणि या सिनेमाच्या हुशार आणि तगड्या टीमसोबत जोडले जाण्याचा मला मनस्वी खूप आनंद होत आहे. ‘झपाटलेला 3’ हा सिनेमा म्हणजे चाहत्याला मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. जगभरातील प्रेक्षकांसमोर ही कलाकृती लवकरात लवकर आणण्यासाठी आम्ही आतुर झालो आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube