ओम फट स्वाहा! Adinath Kothare पुन्हा घेऊन येतोय तात्या विंचू; सोशल मिडीयावर शेअर केलं पोस्टर

ओम फट स्वाहा! Adinath Kothare पुन्हा घेऊन येतोय तात्या विंचू; सोशल मिडीयावर शेअर केलं पोस्टर

Adinath Kothare shared a poster of Zapatlela movie : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे म्हटलं की त्यांचा झपाटलेला ( Zapatlela movie ) हा चित्रपट आणि तात्या विंचू हे पात्र लगेच डोळ्यासमोर येत. त्यातच आता झपाटलेला हा चित्रपट नव्या रूपामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर ( poster ) नुकतंच अभिनेता आदिनाथ कोठारे ( Adinath Kothare ) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

>मोठी बातमी : कोकणातला तिढा सुटला; भाजपकडून राणेंना उमेदवारी; विनायक राऊतांसोबत भिडणार

हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये दिवंगत लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत होते. शिवाय महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हेही महत्त्वाच्या भूमिकेत होते. या अजरामर चित्रपटाचा 2013 मध्ये वीस वर्षानंतर झपाटलेला टू हा सिक्वल देखील रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा झपाटलेला मी तात्या विंचू या नावाने हा चित्रपट एका आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे.

महेश कोठारे यांचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये तात्या विंचूचा अर्धा चेहरा आणि अर्धा चेहरा आदिनाथ कोठारेचा दाखवण्यात आला आहे. तसेच चित्रपटाचे नाव झपाटलेला मी तात्या विंचू असं आहे. या पोस्टला कॅप्शन देताना आदिनाथने लिहिलं आहे की, होय हे खरं आहे. तात्या विंचू पुन्हा येतोय 2025 ला चित्रपटगृहात ओम फट स्वाहा.

‘अरुण गवळीच्या लेकीला महापौर होईपर्यंत पाठिंबा’; निवडणुकीच्या धामधुमीत नार्वेकरांचं वक्तव्य

त्याच्या या पोस्टवर प्रेक्षकांसह अनेक कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या पोस्टवरून हे देखील दिसत आहे की, महेश कोठारे हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर आदिनाथ कोठारेची चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्याचबरोबर या चित्रपट 2025 ला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube