The Great Indian Family: घरातील धमाल कथा, विकी कौशलने करुन दिली इरसाल कुटुंबियांची ओळख

The Great Indian Family: घरातील धमाल कथा, विकी कौशलने करुन दिली इरसाल कुटुंबियांची ओळख

The Great Indian Family: यशराज फिल्म्सच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली असून विकी कौशल (Vicky Kaushal) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांचा आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोमवारी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’च्या प्रदर्शितची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर दिवशी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

किंग खानचा अ‍ॅक्शनर ‘जवान’ हा सिनेमा त्यानंतर दोन आठवड्यांनी ७ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विकी आणि मानुषी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या सिनेमाचे दिग्दर्शन विजय शंकर आचार्य यांनी केले आहे. सिनेमाच्या पोस्टर आणि शीर्षकावरुन हा सिनेमा कौटुंबिक कॉमेडी असणार असल्याचे खात्री पटते. भारताच्या घराघरात घडणारी मध्यवर्ती कथा यामध्ये मांडण्यात आली आहे.

सोशल मीडियावर विकी कौशलने एक पोस्ट शेअर करुन या पोस्टरसह प्रदर्शित तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्म्सचा हा सिनेमा मजेदार कौटुंबिक मनोरंजन करणारा असल्याचे बघायला मिळत आहे. यासाठी विकीने शेअर केलेला व्हिडिओ जरुर पाहा. भारतीय एकत्र कुटुंब जेव्हा वेगवेगळ्या वयाच्या सदस्यांसह एकत्र राहत असते, तेव्हा त्याचे फायदे आणि तोटेही असतात. विकी यामध्ये आपल्या अतरंगी फॅमिली सदस्यांची ओळख करुन देत असल्याचे दिसत आहे.

New Jersey : अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली!

दरम्यान, विकी कौशल आगामी मेघना गुलजारच्या सॅम बहादूर सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी लष्करप्रमुख असलेल्या सॅम माणेकशॉ आणि फील्ड मार्शल बनलेला पहिला भारतीय लष्करी अधिकारी यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

मानुषी छिल्लरचा विचार करता तिने यशराज फिल्म्सबरोबर ३ सिनेमाचा करार केला होता. पैकी ‘सम्राट पृथ्वीराज’ हा तिचा ऐतिसाहिसकसिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये ती संयोगिता ही व्यक्तिरेखा साकारत होती. आता ती विकी कौशलबरोबर तिचा दुसरा सिनेमा करण्यासाठी सज्ज झाली आहे. यानंतर ती दिनेश विजानच्या आगामी सिनेमात देखील झळकणार आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा सिनेमा तिच्या कारकिर्दीला चांगलीच कलाटणी देऊ शकणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube