नेटफ्लिक्सला दिलासा, The Indrani Mukerjea Story ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

नेटफ्लिक्सला दिलासा, The Indrani Mukerjea Story ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story ) या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या वेब सिरीजला न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. त्यामुळे आता या सिरीजच्या प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल, दोन खेळाडू बाहेर

या वेब सिरीजमुळे या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होत आहे. तसेच यामध्ये एका आरोपीला इनोसंट दाखवण्यात आलं आहे. असा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता. त्यामुळे रिलीजच्या अगोदर नेटफ्लिक्सला ही सिरीज सीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्पेशल स्क्रीनिंग करून दाखवावी लागणार असल्याचं कोर्टाने सांगितलं होत. त्यानुसार आज न्यायालयात या सिरीजचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

शीना बोरा हत्याकांड काय आहे?

2012 मध्ये मुंबईमध्ये शिनाबोरा यांची हत्या करण्यात आली होती. मात्र तीन वर्षे या प्रकरणात कोणताही तपास लागला नव्हता. तर 2015 मध्ये शिनाची आई इंद्राणी मुखर्जी यांना यामध्ये अटक करण्यात आली. इंद्राणी यांनी दोन लग्न केली होती. पहिल्या लग्नामध्ये त्यांना शिनाबोरा ही मुलगी होती. तर दुसरे लग्न त्यांनी पीटर मुखर्जी या प्रसिद्ध टीव्ही इंडस्ट्री संबंधित व्यावसायिक अशी केलं होतं.

Israel Hamas War : मदतीच्या प्रतिक्षेतील पॅलेस्टिनींवर इस्त्रायलचा हल्ला; 50 लोकांचा मृत्यू

या सिरीजचं दिग्दर्शन शाना लेवी आणि उराज बहल यांनी केलं आहे. सिरीजमध्ये इंद्राणी मुखर्जी आणि त्यांची मुलं विधी मुखर्जी आणि मिखाइल बोरा यांच्यासह अनुभवी पत्रकार आणि वकील पाहायला मिळणार आहेत. जे आपला याप्रकरणी अनुभव शेअर करणार आहेत. तसेच या केसबद्दल आणखी काही गोष्टी या सिरीजच्या माध्यमातून समोर येतील. ज्या आजपर्यंत समोर आलेल्या नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube