The Kerala Story: “खरे नाव बदलावे लागले…” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T163403.029

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. काही चाहते या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. तर काही लोक या सिनेमावर टीका करत आहेत. भारतामध्ये रिलीज झाल्यावर या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. भारतामधील काही राज्यात या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली आहे. आता हा सिनेमा यूकेमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबाबत अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) एक खास पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. तर तिने एक मोठा धक्कादायक खुलासा केली आहे.

अदा शर्माने एका मुलाखतीत तिचे खरे नाव अदा नसल्याचा खुलासा केला आहे, तिने तिचे नाव बदलण्याचे कारणही सांगितले आहे.YouTuber पवनी मल्होत्राला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान अदा शर्माने तिला अदा हे नाव कसे पडले, लहानपणी ती खूप खेळायची का? असा प्रश्न विचारताच यावर अभिनेत्रीने तिचे खरे नाव अदा नसून चामुंडेश्वरी अय्यर असल्याचे सांगितले आहे. त्याने ते बदलून अदा शर्मा केले आहे.

यानंतर अभिनेत्रीने तिचे नाव बदलण्याचे कारण देखील सांगितले आणि म्हणते की तिचे खरे नाव उच्चारणे थोडे कठीण होते. लोकांना त्याचे नाव नीट कळू शकले नाही. या कारणास्तव त्यांनी आपले नाव चामुंडेश्वरीवरून बदलून अदा केले आहे. गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट देशातील विविध राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला पण पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटावर टीका केली होती.अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदा शर्माच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर अनेक जण या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अदाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. पण काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत.

Tags

follow us