Unlock Zindagi: ‘अनलॉक जिंदगी’ ठरला 9 पुरस्कारांचा मानकरी

Unlock Zindagi: ‘अनलॉक जिंदगी’ ठरला 9 पुरस्कारांचा मानकरी

Unlock Zindagi : कोरोना काळातील भयानक वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’ (Unlock Zindagi:) या सिनेमाने प्रदर्शनाअगोदरच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवांमध्ये (National International Film Festival) आपली मोहोर उमटवली आहे. गेल्या काही दिवसाअगोदर या सिनेमाचा रोमांचकारी ट्रेलर (Movie Trailer) प्रदर्शित करण्यात आला होता.

‘अनलॉक जिंदगी’ या सिनेमाला आतापर्यंत शिकागो, टोरांटो, पिनॅकल, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान, लंडन आणि १३ ‌‌व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकने मिळाली आहेत.

तसेच मिलान फिल्म अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म’ आणि पिनॅकल फिल्म अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ या २ पुरस्काराने या सिनेमाला सन्मानीत करण्यात आले आहे. ‘अनलॉक जिंदगी’ या सिनेमाची कथा माणसाचे मतपरिवर्तन करणारी आहे. हा सिनेमा पाहताना चाहत्यांना अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्याशी समरूप वाटणारी आहेत, असे मत या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक राजेश गुप्ता यांनी यावेळी सांगितले आहे.

Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

रियल रील्स प्रस्तुत या सिनेमाने निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता आहेत. या सिनेमात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांनी मुख्य भूमिका साकारले आहेत. या सिनेमाचे लेखन आणि संवाद लेखन राजेश गुप्ता यांनी केले आहे. १९ मे रोजी ‘अनलॉक जिंदगी’ महाराष्ट्रभरामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube