‘ओले आले’चा ट्रेलर प्रदर्शित, नाना पाटेकर-सिध्दार्थ चांदेकर बापलेकाच्या भूमिकेत

  • Written By: Published:
‘ओले आले’चा ट्रेलर प्रदर्शित, नाना पाटेकर-सिध्दार्थ चांदेकर बापलेकाच्या भूमिकेत

Ole Aale Trailer Out: गेल्या काही वर्षांत मराठीत अनेक दर्जेदार निर्मिती होत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारीदेवा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ झिम्मा 2या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. झिम्मा २ मध्ये सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, आता सिद्धार्थचा आणखी एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच सिध्दार्थच्या ओले आले (Ole Aale) सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे.

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या काळ्या साडीतील लूकनं चाहते घायाळ… 

सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने ट्रेलरला कॅप्शन दिले की, आता आनंदात करा नवीन वर्षाचा श्रीगणेशा या अप्रतिम बापलेकांसह! सादर आहे ‘ओले आले’चा नवीन ताजा टवटवीत ट्रेलर! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये 5 जानेवारी 2024 पासून. चला फिरूया, हसूया, जगूया.., असं सिध्दार्थनं लिहिलं.

निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळलं! लोकसभेत नवं विधेयक मंजूर… 

या ट्रेलरच्या सुरुवातीलाच नाना पाटेकर सिद्धार्थला बाकरवडी देताना दिसत आहेत. तेव्हा सिद्धार्थ नाना पाटेकरांनाला म्हणतो, बाबा मी असलं काही खात नाही, तुम्ही खाण्यासाठी जगता. मी जगण्याठी खातो. या चित्रपटात नाना पाटेकर आणि सिध्दार्थ हे बाप-लेकाची भूमिका साकारत आहेत. या ट्रेलरमध्ये नाना पाटेकर हे सिध्दार्थसोबत मस्त धम्माल करतांना दिसत आहे. मकरंद अनासपुरे देखील ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. या चित्रपटात ते बाबूराव हे व्यक्तिरेखा साकारणार आहेच. तर या चित्रपटात सायली संजीवही दिसत आहे.

या चित्रपटातील संवाद हे माणसाला शहाण कऱणारे आहेत. पैसे कमावणं आणि तो योग्य रितिने खर्च करणं या दोन्ही कला मिळून आयुष्य बनतं, असं सांगणारे नाना पाटेकरांच्या तोंडचा हा संवाद कमाल आहे. आयुष्य आपण किती जगलो त्यापेक्षा कसे जगलो, हे महत्वाचं आहे, हा संवादही जगणं शिकवणारा आहे.

ओले आले हा चित्रपट कोकोनेट मोशन पिक्चर्सचे संस्थापक रश्मिन मजीठिया यांनी निर्मित केला. तर प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. ओले आले या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर हे मराठीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात 5 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube