आजपासून महागणार ट्रेनचा प्रवास, खिशाला किती बसणार फटका?, कोणत्या गाडीला होणार वाढ?

21 डिसेंबर रोजी मंत्रालयाने घोषणा केली होती. रेल्वे भाड्यात सुधारणा करण्याची ही एका वर्षात दुसरी वेळ आहे. आजपासून नियम लागू.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 26T085031.542

ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस महत्वचा आहे. (Railway) कारण आजपासूनच ट्रेनचा प्रवास महागला आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीटाच्या रकमेत वाढ केली असून ती आजपासून लागू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी 215 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी सामान्य श्रेणीच्या तिकिटांच्या किमतीत प्रति किलोमीटर एक पैशाने तर मेल/एक्सप्रेस गाड्यांमधील सर्व गाड्यांच्या नॉन-एस आणि एसी वर्गांसाठी तिकिटाच्या किमतीत प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्याची अधिसूचना जारी केली.

21 डिसेंबर रोजी मंत्रालयाने घोषणा केली होती की, हे प्रवासी भाडं 26 डिसेंबर (आज) पासून वाढवले ​​जाईल. मंत्रालयाने प्रवासी रेल्वे भाड्यात सुधारणा करण्याची ही एका वर्षात दुसरी वेळ आहे. मागील भाडेवाढ जुलैमध्ये करण्यात आली होती. आपला निर्णय योग्य असल्याचं समर्थन करत मंत्रालयाने म्हटलं की, प्रवासाचं भाडं परवडणारं बनवण्याचे उद्दिष्ट म्हणजे प्रवाशांसाठी (तिकीटांची) सस्टेनेबिलिटी आणि कामकाजाची शाश्वतता यांच्यात संतुलन राखणे आहे.

गुजरातमधील कच्छमध्ये पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के; लोक घाबरले, अनेकजन घर सोडून पळाले

सुधारित भाडंरचनेअंतर्गत, उपनगरीय सेवा आणि हंगामी तिकिटांच्या भाड्यात कोणताही बदल झालेला नाही, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. यामध्ये उपनगरीय उपनगरीय (सब अर्बन) आणि गैर-उपनगरीय अशा दोन्ही मार्गांचा समावेश आहे. साधारण नॉन एसी (गैर-उपनगरीय) सेवासांठी, द्वितीय श्रेणी जनरल, स्लीपर श्रेणी सामान्य आणि प्रथम श्रेणी जनरलमध्ये भाडं श्रेणीबद्ध पद्धतीने तर्कसंगत करण्यात आले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, द्वितीय श्रेणीच्या जनरलमध्ये 215 किमी पर्यंतच्या प्रवासाच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, ज्यामुळे कमी अंतराच्या आणि दैनंदिन प्रवाशांवर परिणाम होणार नाही. त्यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, गरीब रथ, जन शताब्दी, अंत्योदय, गतिमान, युवा एक्सप्रेस, नमो भारत रॅपिड रेल सह इतर विशेष गाड्यांनाही वर्गवार भाडेवाढ लागू होईल. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क इत्यादींमध्ये कोणताही बदल नाही. जीएसटी देखील लागू राहील. तसेच रेल्वेचे हे “सुधारित भाड” फक्त आजपासून (26 डिसेंबर) किंवा आजनंतर बुक केलेल्या तिकिटांना लागू होतील. या तारखेपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर प्रवास आजच्या तारखेनंतर केला गेला तरीही कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

कोणत्या श्रेणीत किती वाढलं तिकीत ?

216 किमी ते 750 किमी अंतरासाठी भाडे 5 रुपयांनी वाढेल.

751 किमी ते 1250 किमी अंतरासाठी 10 रुपये.

1251 किलोमीटर ते 1750 किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी 15 रुपये वाढ.

1751 किलोमीटर ते 2250 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपयांची वाढ होईल.

follow us