रणसंग्राम महापालिकांचा! निवडणूक लढवायची सर्वांनाच; जागा वाटपाचा तिढा सुटेना, वाचा खास स्टोरी
राज्यात महापालिका निवडणुकांचं वार वाहतय. सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. सर्वांनाच आपली ताकत दाखवायची आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांच वार जोरदार सुरू आहे. (BJP) अनेक ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी आघाडी अन् युती असा प्रयोग होताना दिसत आहे. परंतु, यामध्ये जागा वाटपाचा पेच कायम असल्याचं. अनेक ठिकाणी जागा वाटपावर एकमत होताना दिसत नाही. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मोठी नाराजी आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्वच पक्षांची तोंड विरुद्ध दिशेला आहेत की काय अशी स्थिती समोर येत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्या सुरूवात होऊनही तीन दिवस उलटले आहेत. परंतु, आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. पक्षांमध्ये जागा वाटपावरून रुसवे-फुगवे सुरू आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांसमोर खेळ मांडला अशी म्हणण्याची वेळ आली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही मोठा पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आर्थिक राजधानीच्या सत्ता केंद्रामध्ये भाजप आणि शिंदे सेनेत 200 जागांवर एकमत झाले आहे. तर उर्वरीत 27 जागांसाठी जोर बैठका सुरू आहेत.
या जागांसाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात याविषयी चर्चा सुरू आहे. तीनही नेत्यांमध्ये मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांसाठी जागा वाटापावर खलबत सुरू आहेत. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, कल्याण-डोबिंवलीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यावरून भाजप-शिंदेसेनेतील पेच कायम आहे. नबाब मलिक हे जर राष्ट्रवादीचे सारथ्य करत असतील तर मग ही बोलणी नकोच असा सूर इतर दोन पक्षांनी, विशेषतः भाजपने घेतला आहे. त्यामधून तोडगा निघण्याची शक्यता नाही.
दुसरीकडे जर महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत. तर पुणे-पिंपरी पाठोपाठ मुंबईतही दादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांचे सूर जुळण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपा युतीचा पेच अजून काही सुटलेला नाही.युती संदर्भात दोन्ही पक्षाच्या पाच बैठका निष्फळ ठरल्या आहेत.आज पुन्हा भाजपा आणि शिवसेनेची युती आणि जागा वाटप संदर्भात बैठक होणार आहे.आजच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
प्रशांत जगतापांचा राजीनामा अन् अजितदादांशी युती; सुप्रिया सुळेंनी दिली A टू Z माहिती
युती आणि जागा वाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे.युती करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांचे स्थानिक नेत्यांना आदेश आल्याचे समजते.सध्यातरी एकत्र महापालिका लढण्याचा भाजपा आणि शिवसेना नेत्यांचा सूर आहे. लवकरच हा पेच दूर होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पुण्यातील राष्ट्रवादीत गेल्या दोन दिवसांपासून गुप्त बैठकांना वेग आला आहे. स्थानिक नेत्यांसह दोन्ही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा खल सुरू आहे. पण जागा वाटपाचा तिढा कायम आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर जागा वाटपावर अंतिम निर्णय होऊ शकतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा रविवारपर्यंत टळल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे पुण्यात महायुतीमध्ये पण जागा वाटपावरून पेच प्रसंग निर्माण झाला आहे. पुण्यात 35 जागांवर लढण्याचा शिंदे सेनेचा निर्धार आहे. त्याहून कमी जागा घेण्यावर पक्ष तयार नसल्याचे समोर येत आहे. पुण्यात महायुतीमध्ये जागावाटपात मान-अपमान टाळावा यासाठी दोन्ही पक्ष दक्ष आहेत. शिंदे सेनेने येथे जागा वाटपात तडजोड करणार नाही असा थेट संदेश दिला आहे. तर दुसरीकडे भाजपने पुण्यात 125 जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने शिवसेनेच्या पदरात फारसं काही पडणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात जागा वाटपाचा तिढा कायम आहे.
हे सगळ सुरू असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतील जागा वाटपाचा पेच अद्याप कायम आहे. आज या दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वंचितने काँग्रेसकडे 43 जागांची मागणी केली आहे. तर वंचितची केवळ 7 जागांवर बोळवण करण्याची तयारी सुरू असल्याचे समोर येत आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे काँग्रेसने जाहीर केलेले आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षापाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वंचितसोबत आघाडीसाठी बोलणी करत आहे.
