Tu Bhetashi Punha: ‘तू भेटशी पुन्हा’ या मालिकेच्या विशेष प्रोमो BTSने वेधले प्रेक्षकांचे लक्ष!

Tu Bhetashi Punha: ‘तू भेटशी पुन्हा’ या मालिकेच्या विशेष प्रोमो BTSने वेधले प्रेक्षकांचे लक्ष!

Tu Bhetashi Punha: सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच विविध गोष्टी करू पाहते. (Marathi Serial) मालिकेचे निराळे विषय आणि रंजक कथानकं प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकतात. सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर नव्या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. (Tu Bhetashi Punha Promo) मालिकेचे नाव आहे ‘तू भेटशी नव्याने’. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

अभिनेता सुबोध भावे हा यापूर्वी निरनिराळे गाजलेले चित्रपट, विविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुबोध भावे आता नवीन काय घेऊन येणार, अशी चर्चा सगळीकडे रंगत असतानाच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. सुबोध भावे यांनी मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. पुनरागमन म्हटलं तर धमाकेदार सुरुवात हवीच! अशा प्रकारचीच धमाकेदार भूमिका घेऊन सुबोध भावे आला आहे.

मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आहे. नव्या प्रोमोने सगळीकडे धुमाकूळ घातला असून सुबोधच्या तरुण परिवेषामुळे तो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतो आहे. सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. याच प्रोमोदरम्यानचे विशेष BTS प्रेक्षकांसमोर आले आहे. सुबोधची बाईकवरील एन्ट्री, त्याची आणि शिवानीची भेट याबद्दलची काही विशिष्ट दृश्ये यातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

Shah Rukh Khan: ‘किंग’ मधील शाहरुख खानचा लूक लीक; सोशल मीडियावर सेटवरील Photo Viral

शिवाय सुबोधचा 25 वर्षांआधीचा परिवेष कसा केला, याबद्दलचे BTSदेखील आपल्याला पाहायला मिळत आहे. AI परिवेष कशा प्रकारे करण्यात आला, हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. या तंत्रज्ञानाच्या मागे किती मोठा चमू काम करतो आहे, हे आपल्याला यातून पाहायला मिळेल. शिवानी आणि सुबोध यांचे हे विशेष असे पडद्यामागील दृश्य प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखीन भर पाडेल. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत राहा सोनी मराठी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज