Tuja Maja Sapan: सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये वसंत ऋतूचा बहर

Tuja Maja Sapan: सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये वसंत ऋतूचा बहर

Tuja Maja Sapan: मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी. नेहमी विविध विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Sony Marathi) आशय आणि विषय यांनी समृद्ध असणार्‍या मालिकांची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवर नात्यांची सुरेख गुंफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळते. (Tuja Maja Sapan) फेब्रुवारी महिना हा सगळ्यांसाठीच खास असतो. (Marathi Serial) सगळीकडे प्रेमाचे वातावरण बहरलेले असते. वेलेंटाईन डे (Valentine Day) जवळ आला की प्रेमाचे गुलाबी वातावरण सगळीकडे निर्माण होते.

मालिकांमधील निरनिराळ्या जोड्यांमध्येदेखील प्रेमाची कबुली वेलेंटाईन डेनिमित्त दिली जाईल का, हे पाहणे प्रेक्षकांसाठी खास असेल. ते अनुसरूनच सोनी मराठीवरील मालिकांमध्ये प्रेमाची कबुली दिली जाणार आहे. ‘तुजं माजं सपान’ (Tuja Maja Sapan) मालिकेत प्राजक्ता आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता धडपड करत आहे. तिला कुस्ती अकादमी सुरू करायची आहे आणि आता वीरू तिला यासाठी मदत करणार आहे, तिला पाठिंबा देणार आहे. एकंदर त्यांच्यात जवळीक निर्माण होणार आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्यात दिवसेंदिवस प्रेमाचे रंग बहरणार आहेत. पण त्यात आता जोजोच्या येण्याने मयूरीच्या मनात असलेले प्रेम ती राजवीरसमोर काबूल करणार का, हे पाहायला मिळेल. वेलेंटाईन डेनिमित्त राजवीर आणि मयूरी हे चक्क कोळीवाड्यात विशेष नाचताना दिसणार आहेत. प्रेक्षकांना ही विशेष पर्वणी असेल.

आता मयूरी प्रेमाची कबुली देणार का, हे मालिकेतच पाहायला मिळेल. ‘राणी मी होणार’ मालिकेत मीरा आणि मल्हार यांचे लग्न झाले असूनदेखील आपल्या अस्तित्वासाठी लढणारे मीरा आणि मल्हार यांच्यातदेखील प्रेमाचे रंग बहरणार आहेत. मीरा आपल्या मनातल्या गोष्टी मल्हारला सांगणार असून आपल्या प्रेमाची कबुली ती मल्हारला देणार आहे. त्यामुळे मीरा आणि मल्हार यांच्यात जवळीक निर्माण होताना प्रेक्षकांना दिसेल.

Sai Tamhankar: भारतात नेटफ्लिक्सवर नंबर 1वर सईचा ‘भक्षक’ सिनेमा होतोय ट्रेंड

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Motthi Swapna) मालिकेत बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो आहे. डॉक्टर होण्याच्या या प्रवासात तिला अनेक जणांचा पाठिंबा आहे, तर अनेक जण तिच्या स्वप्नाच्या आड येत आहेत. डॉक्टर विशालदेखील तिला उत्तम सपोर्ट करत आहे. पण इराला ते बघवत नाही कारण तीदेखील डॉक्टर विशालच्या प्रेमात असून ती वेलेंटाईन डेनिमित्त विशालला आपल्या मनातील सांगण्याची तयारी करते. पण काही करणामुळे इरा पोहचू शकत नाही आणि बयो तिच्याऐवजी जाणार आहे. त्यामुळे बयो आणि विशाल यांच्यात काही विशेष घडणार का, हे पाहायला मिळेल.

एकंदर सोनी मराठी वाहिनी या वेलेंटाईन डेनिमित्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विशेष असे मालिकांचे भाग घेऊन येत आहे. पाहायला विसरू नका वेलेंटाईन डे विशेष ‘तुज माजं सपान’, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’, ‘राणी मी होणार’ आणि ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकांमधील वसंत ऋतूचा बहर फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज