टीव्हीफ ची धमाकेदार एंट्री आता मराठीत; पहिला चित्रपट ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची’ची केली घोषणा!
दमदार विषय आणि जबरदस्त कलाकारांना घेऊन बायंगी :पाळायची नाही टाळायची! हा धमाकेदार चित्रपट लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत.
TVF makes a smashing entry into Marathi : केवळ देशातच नाही तर जगभरात आपल्या क्रीएटिव्ह कंटेंट मुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवाणारी टीव्हीफ आता मराठी माणसाची मनं जिंकायला सज्ज झालीय. टीव्हीफ ने आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून ,ते दमदार विषय आणि जबरदस्त कलाकारांना घेऊन बायंगी :पाळायची नाही टाळायची! हा धमाकेदार चित्रपट लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. अलौकिक लोककथांच्या जगातून एक रंजक कथा आपल्यासमोर अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा टीव्हीफ चा हा प्रयन्त प्रेक्षकांना एका भन्नाट प्रवासावर घेऊन जाणार यात शंका नाही.
मनोरंजनाचा पुरेपूर धमाका असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन गुल्लक सीझन 5चे दिग्दर्शक अभय राऊत यांनी केलं आहे तर बायंगी सोबत या प्रवासात अमेय वाघ प्रमुख भूमिकेत झळकरणार आहे आणि सोबतच हार्दिक जोशी, मनमीत पेम आणि अविनाश खेडेकर यांच्या भूमिका देखील पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांत टीव्हीएफने सातत्याने प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे, जवळचे वाटणारे आणि प्रभावी आशयाचे वेब शो दिलेले आहेत. 2026 मध्ये टीव्हीएफचे आतापर्यंत 9 शो प्रदर्शित झाले असून त्यामध्ये सोनी लिव्ह वरील गुल्लक सीझन 5, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वरील सप्ने व्हर्सेस एव्हरीवन सीझन 2 आणि अॅस्पिरंट्स सीझन 3, नेटफ्लिक्स वरील हॅलो बच्चो सीझन 1 तसेच जिओहॉटस्टार वरील स्पेस जेन : चांद्रयान सीझन 1 यांचा समावेश आहे.प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स या कार्यक्रमात टीव्हीएफने ‘वन’आणि ‘कॉलेज फेस्ट’ यांसारख्या चित्रपटांसह मोठ्या घोषणांची मालिका सादर करून विशेष चर्चा रंगवली.
पहिलं चायनीज पुण्यात खाल्लं, आता चायनीज फूडच्या दर्जाची तपासणी करणं गरजेचं वाटतं – तुकाराम मुंढे
द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ) विषयी
2012 मध्ये अरुणाभ कुमार यांनी स्थापन केलेले द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ) हे भारतातील अग्रगण्य डिजिटल-प्रथम आशय निर्मिती स्टुडिओ असून देशातील सर्वाधिक मान्यता प्राप्त कथाकथन ब्रँडपैकी एक आहे. गेल्या दशकात टीव्हीएफने सांस्कृतिकदृष्ट्या जवळचा आणि सर्वांनाच आपलासा वाटणारा आशय स्केचेस, मिनी-मालिका आणि दीर्घ-स्वरूपाच्या कार्यक्रमांद्वारे सादर करत भारतीय मनोरंजनविश्वाला नवी दिशा दिली आहे.
टीव्हीएफच्या गाजलेल्या कार्यक्रमांमध्ये पंचायत, गुल्लक, कोटा फॅक्टरी, अॅस्पिरंट्स, टीव्हीएफ पिचर्स, ये मेरी फॅमिली, क्युबिकल्स आणि पर्मनंट रूममेट्स यांचा समावेश आहे. टीव्हीएफच्या सात मूळ मालिकांना IMDb च्या ‘टॉप 250 टीव्ही शोज ऑफ ऑल टाइम’ यादीत स्थान मिळाले असून ही कामगिरी करणारे टीव्हीएफ हे एकमेव भारतीय स्टुडिओ आहे.
अब्जावधी व्ह्यूज आणि जागतिक स्तरावरील मोठ्या प्रेक्षकसमूहासह टीव्हीएफ यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, झी५ आणि जिओहॉटस्टार यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. तमिळ, तेलुगू आणि मराठी भाषांमधील वाढत्या आशय निर्मितीसह टीव्हीएफ ‘लाईट्स. कॅमेरा. एक्सपेरिमेंट.’या आपल्या तत्त्वज्ञानातून भारतीय कथाकथनाच्या भविष्याला आकार देत आहे.