दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची कोर्टात बिनशर्त माफी

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची कोर्टात बिनशर्त माफी

Vivek Agnihotri: काश्मीर फाइल्स (Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची (High Court) बिनशर्त माफी मागितली आहे. 2018 साली न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्याच्या संदर्भात सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात ते हजर झाले होते. यादरम्यान विवेक अग्निहोत्रीने आपल्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने विवेक अग्निहोत्री यांची अवमान प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्याविरोधात 2018 च्या खटल्यासंदर्भात कोर्टात आज सुनावणी होती. अग्निहोत्रीला गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशात न्यायालयाने 10 एप्रिलला हजर राहण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, आज या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, न्यायालयीन प्रकरणांमध्ये आपण आणि सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशाराही त्यांनी न्यायालयाला दिला.

Uorfi Javed : “मुस्लिमाच्या नावावर…; उर्फी जावेदच्या ‘त्या ‘व्हिडिओवर चाहते संतापले

कोर्टाने विवेक अग्निहोत्रीला सांगितले की, तुम्ही म्हणता की तुम्हाला न्यायव्यवस्थेचा आदर आहे आणि तुम्ही तसे जाणूनबुजून करण्याचा विचारही केला नाही. त्यामुळे तुम्हाला बजावलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेण्यात येत आहे. तुम्‍ही अवमानाच्‍या आरोपातूनही मुक्त आहात. न्यायालयाने आता या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख 24 मे निश्चित केली आहे.

दरम्यान, 2018 मध्ये विवेक अग्निहोत्री यांनी ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात न्यायमूर्ती एस मुरलीधर यांनी कार्यकर्ता गौतम नवलशा यांना दिलासा दिल्याचा आरोप चित्रपट निर्मात्याने केला होता. खरे तर न्यायमूर्ती मुरलीधर यांनी नवलखा यांची नजरकैदेची आणि ट्रान्झिट रिमांड रद्द केली होती. यामुळे विवेकने न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्यावर टिप्पणी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube