Veena Jagtap: मेट्रोमोनियल साईटवरील फेक अकाऊंट पाहताच वीणा संतापली, म्हणाली “गेल्यावर्षीही…”

Veena Jagtap: मेट्रोमोनियल साईटवरील फेक अकाऊंट पाहताच वीणा संतापली, म्हणाली “गेल्यावर्षीही…”

Veena Jagtap: बिग बॉस (Big Boss) या शोमुळे जोरदार चर्चेत आलेली अभिनेत्री वीणा जगतापला (Veena Jagtap) चांगलीच लोकप्रियता मिळत असल्याचे दिसून येत आहे. वीणा ही सोशल मीडियावर (Social media) कायम अॅक्टिव्ह असते. अनेक वेगवेगळे पोस्ट ती सोशल मीडियावर कायम शेअर करत असते. नुकतीच वीणाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, मॅट्रिमोनियल साईटवर (Matrimonial site) तिचा फेक अकाऊंटची माहिती चाहत्यांनी दिली आहे.

74

Veena Jagtap Post

वीणानं इन्स्टाग्रामवर (Instagram) मॅट्रिमोनियल साईटवरील फेक अकाऊंटचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत असे दिसून आले आहे की, एका मॅट्रिमोनियल साईटवर वीणाचं फेक अकाऊंट क्रिएट केले आहे. त्या अकाऊंटला वीणाचा फोटो लावण्यात आला आहे. वीणानं मॅट्रिमोनियल साईटवरील अकाऊंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन सांगितले आहे की, ‘माझा फॅन असणाऱ्या एका दादानं हा स्क्रिनशॉट मला पाठला आहे. लोक असं का करत असतात? हे मला कळत नाही.

मॅट्रिमोनियल साईटवर खोटी माहिती. मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे, याची मलाही काही कल्पना नाही. हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीची मला दाद द्यावीशी वाटते. अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा. असे तिने यावेळी लिहिले आहे. वीणानं बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या सेकेंड सीझनमध्ये एन्ट्री केली होती. वीणा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. बिग बॉस मराठी-2 मधील वीणा आणि शिव ठाकरे यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी देखील मोठी पसंती दिली होती. हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर चांगलीच झाल्याची पाहायला मिळत होती.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

एका मुलाखतीच्या दरम्यान वीणा जगतापसोबतच्या नात्याबद्दल शिव ठाकरे म्हणाला होता की,”बिग बॉस मराठी’ आणि ‘बिग बॉस 16’ माझ्यासाठी खूप खास ठरणार आहे. तसेच या प्रवासात नातीदेखील माझ्यासाठी खास आहेत. एखाद्या व्यक्तीवर विचार करुन प्रेम केलं जात नाही. मी आणि वीणा रिलेशनमध्ये नसलो तरी आज देखील एकमेकांच्या चांगलंच संपर्कात असतो. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याअगोदर आमचं बोलणं झालं होतं. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या व्हॉट्स अॅप लग्न या सिनेमात तिनं काम केले आहे. तसेच ठिपक्यांची रांगोळी या सीरियलमध्ये वीणाने अवंतिका ही भूमिका साकारली होती. वीणानं ‘आनान’ या सिनेमात देखील प्रमुख भूमिका चांगलीच चर्चेत आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube