Oscar Awards : सायंकाळी सात वाजता येथे पाहा ऑस्कर नॉमिनेशन सोहळा…

Untitled Design (64)

नवी दिल्ली : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ऑस्कर पुरस्कार जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे म्हणजेच अॅकॅडमी अॅवॉर्ड्सचे आयोजन 12 मार्च 2023 ला लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये करण्यात आले आहे.

त्याचबरोबर या समारंभाचं सुत्रसंचालन ‘लेट नाइट टॉक शो’ चे प्रेझेंटर जिमी किमेल यांना सोपविण्यात आली आहे. मात्र हा ऑस्कर नॉमिनेशन सोहळा तुम्हाला पाहायचा असेल तर ऑस्कर नॉमिनेशन सोहळा मंगळवारी सकाळी 5:30 वाजता पीएसटी/8:30 पूर्वाह्न ईएसटी वर प्रसारित करण्यात आला तर भारतीय मानक वेळेनुसार सायंकाळी सात वाजता हा ऑस्कर नॉमिनेशन सोहळ्याची प्रस्तुति ऑस्कर डॉट कॉम, ऑस्कर डॉट ओआरजी, या यूट्यूब चॅनेलसह अकादमीच्या सोशल मीडिया चॅनल्सवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात येणार आहे.

ऑस्कर पुरस्कार जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याअगोदरच या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड मिळाला आहे.

दरम्यान अनेक भारतीय चित्रपटांना यंदाच्या 95 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. या चित्रपटांना देखील ऑस्कर पुरस्कार मिळण्याची आपेक्षा आहे. यामध्ये ‘छेल्लो शो’ (द लास्ट फिल्म शो), ‘आरआरआर’ चे ‘नाटू नाटू’ गाणे, शौनक सेन यांची डॉक्युमेंट्री ‘ऑल दॅट ब्रीड्स’ आणि ‘द एलिफेंट विस्परर्स’ यांचा समावेश आहे. जर ऑस्कर अॅवॉर्ड्स नॉमिनेशनमध्ये ‘आरआरआर’ किंवा छेल्लो शो यांसारखे भारतीय चित्रपट शॉर्टलिस्ट झाले तर या चित्रपटांची स्पर्धा अवतार : द वे ऑफ वॉटर, टॉप गन : मॅवरिक, एल्विस, द फेबल्स मेंस आणि द बंशी ऑफ इ शरिन यांसोबत होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube