Yashwantrao Natya Sankul: यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज! पहिल्याच दिवशी होणार प्रयोग

Yashwantrao Natya Sankul: यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज! पहिल्याच दिवशी होणार प्रयोग

Yashwantrao Natya Sankul: ‘यशवंतराव नाट्य संकुल’ (Yashwantrao Natya Sankul) या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेल्या काही दिवस नूतनीकरण सुरु असलेली ही वास्तू आता कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज करण्यात आली आहे.

बहुप्रतीक्षित असलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल’ १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी खुले होणार आहे. नाटकांचे प्रयोग करण्यासाठी नाट्य संकुल व्यवस्थापकांकडे रीतसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी यावेळी केले आहे.

आधुनिक, अद्ययावत अशा या नाट्य संकुलात सुरेख अंतर्गत सजावट, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रंगमंच, ध्वनियंत्रणा, स्वछतागृह आदि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोबत या नव्या वास्तूत पार्किंग स्लॉटची खास व्यवस्था करण्यात देखील करण्यात आली आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

३० मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरु झाले होते. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर प्रशांत दामले, नवीन कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ या सर्वानी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं, यासाठी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांमुळे येत्या १ ऑगस्टपासून हे नाट्य संकुल सज्ज होणार आहे. नव्याने दिमाखात सुरु झालेलं हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच, रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी यावेळी दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube