Vicky Kaushal आणि Sara Ali Khanचा ‘जरा हटके जरा बचके’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T161706.965

Zara Hatke Zara Bachke: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा 2 जून रोजी रिलीज होणार आहे.

गेल्या काही दिवसाअगोदर या सिनेमाचे पोस्टर विकी आणि साराने सोशल मीडियावर शेअर केले आहे. आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्याची हटके स्टोरी दाखवण्यात आले आहे. कपिल सौम्याच्या आयुष्यात नेमकं काय घडतं? हे चाहत्यांना ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमा पाहायला मिळणार आहे.

‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमात सौम्या आणि कपिल या इंदूरच्या मध्यमवर्गीय विवाहित जोडप्याची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, कपिल आणि सौम्या हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. यानंतर त्यांचे लग्न होते. पण नंतर सौम्या आणि कपिल हे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत आहेत.

आता सौम्या आणि कपिलला घटस्फोट का घ्यायचा आहे? या सवालाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहत्यांना ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा पाहावा लागणार आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि विकी यांच्यामधील केमिस्ट्री असल्याचे दिसून येत आहे. तसेच दोघांचा विनोदी अंदाज देखील दिसून येत आहे.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

या दिवशी होणार रिलीज?

‘जरा हटके जरा बचके’ हा विकी आणि साराचा सिनेमा 2 जून रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. विकी आणि साराबरोबर या सिनेमात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकतेने लागली आहे.

Tags

follow us