मनोरंजन क्षेत्रात तब्बल 18 वर्ष राज्य करणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार?

या मालिकेत गेल्या 18 वर्षांत अनेक बदल झाले. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम केला. काही कलाकारांनी मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 07T135154.667

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक तारक मेहता (Film) का उल्टा चष्मा ही आहे. गेली 18 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं चांगलाच मनोरंजन करत आहे. या शोमधील पात्रांनी घराघरात ओळख निर्माण केली आहे. दयाबेन, जेठालाल, मेहता साहेब आणि सुंदरलाल यांसारखी पात्रे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात कायमची घर करून बसली आहेत. आता जरी दयाबेन शोचा भाग नसली, तरी आजही लोक त्यांना विसरलेले नाहीत. तारक मेहता का उल्टा चष्माच्या टप्पू सेनेसोबत एक संपूर्ण पिढी मोठी झाली आहे.

या मालिकेत गेल्या 18 वर्षांत अनेक बदल झाले. अनेक लोकप्रिय कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम केला. काही कलाकारांनी निर्माता असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. कुणी पैसे न दिल्याचा, कुणी शोषणाचा तर कुणी लैंगिक छळाचे आरोप केले. या आरोपांमुळे असित मोदी यांचा शो अनेकदा वादात राहिला. हळूहळू अनेक जुने कलाकार शोमधून बाहेर पडले.

तारक मेहताच्या चाहत्यांना धक्का! दयाबेन दिशाची वापसी अशक्य; असित मोदींनी कारणही सांगितलं

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बरेच नवे कलाकार आहेत. टप्पू सेना आता मोठी झाली असून जवळपास सर्व कलाकारांनी शोला अलविदा केलं आहे. प्रसिद्ध कलाकारांच्या एकेका करून शो सोडल्यानंतर अनेक वर्षांपासून चर्चा आहे की ‘तारक मेहता…’चा टीआरपी घसरला आहे आणि शो लवकरच बंद होऊ शकतो. अलीकडेच या शोचा निर्माता असित मोदी यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ऑफ-एअर होणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत असित मोदी ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी’च्या 25 व्या वर्षगाठ कार्यक्रमात म्हणाले की असं काहीही नाही. ते म्हणतात, शो बंद होणार नाही आणि त्यांच्यात जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत ते हा शो चालवत राहतील.

follow us