‘3 विरुद्ध 1’; विधान परिषद निकालात महाविकास आघाडीच वरचढ
महाराष्ट्रात 5 जागांवर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे.
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघ : भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले असून त्यांनी बाळाराम पाटील यांचा पराभव केला.
नागपूर शिक्षक मतदारसंघ : महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले तर भाजपचे नागो गाणार पराभूत झाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघ : नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. तर मविआ पुरस्कृत शुभांगी पाटिल यांचा पराभव झाला.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ : मविआचे विक्रम काळे यांनी चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे.
